राज्यात पारा चढला!
By admin | Published: October 19, 2015 02:24 AM2015-10-19T02:24:37+5:302015-10-19T02:24:37+5:30
मान्सूनने मुंबईसह राज्यातून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हिटचे चटके बसू लागले आहेत. मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा सलग तीन दिवस ३७ अंश एवढा नोंदविण्यात येत आहे.
मुंबई : मान्सूनने मुंबईसह राज्यातून माघार घेतल्यानंतर आॅक्टोबर हिटचे चटके बसू लागले आहेत. मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा सलग तीन दिवस ३७ अंश एवढा नोंदविण्यात येत आहे. शिवाय राज्यातील प्रमुख शहरांचे कमाल तापमानही सरासरी ३६ अंशाच्या आसपास आहे. परिणामी, आॅक्टोबर हिटने नागरिक हैराण झाले आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. उर्वरित राज्यात हवामान कोरडे होते. कोकण-गोवा व विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत आणि कोकण-गोव्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. पुढील ४८ तासांसाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३६, २८ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
>>१९ ते २१ आॅक्टोबर : कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यांत हवामान कोरडे राहील.
२२ आॅक्टोबर : कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील.