लोकमत आणि 'ओरिओ'च्या मोदक उपक्रमाला उदंड प्रतिसाद, 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 12:43 PM2024-10-04T12:43:47+5:302024-10-04T12:45:51+5:30
गणेशोत्सवाच्या निमित्ताने ओरिओ आणि लोकमतने एक खास उपक्रम राबवला होता ज्याचे नाव होते 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी'.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या...अशा घोषणांनी बाप्पाला निरोप देण्यात आला. गणेशोत्सव म्हटलं की मोदक आलेच. नेहमीप्रमाणे यंदाही अनेकांनी मोदकांवर ताव मारला असेल. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने ओरिओ आणि लोकमतने एक खास उपक्रम राबवला होता ज्याचे नाव होते 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी'. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. एवढेच नाही तर या उपक्रमाची 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.
लोकमत आणि कॅडबरी ओरिओच्या 'मोदक बनवा घरी, ह्यातच गंमत खरी' या उपक्रमाअंतर्गत स्पर्धकांना एक दिवस ठरवून देण्यात आला होता आणि त्या दिवशी स्वतःच्या घरी कोणत्याही प्रकारचे मोदक बनवायचे होते. या मोदकांचे फोटो दिलेल्या व्हॉट्सअॅप क्रमांक आणि दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करायचे होते. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना कुटुंबासोबत 'लालबागच्या राजा'ला भेटण्याची संधी मिळणार होती.
या स्पर्धेत तीन हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला आणि एका दिवसात विविध प्रकारचे मोदक बनवून फोटो अपलोड करत नवा विक्रम रचला. या स्पर्धेची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. तसेच स्पर्धकांना लालबागच्या राजाचे दर्शन घडवले.
एवढेच नाही तर महाराष्ट्रातील अनेक गणेशोत्सव मंडळांमध्ये लोकमत आणि कॅडबरी ओरिओतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विजेत्यांना बक्षिसेही देण्यात आली. यात ओरिओ बिस्कीटचे पीठ बनवून लोकांना मोदकही बनवण्याचेही टास्क देण्यात आले होते. मंडळातील या उपक्रमांनाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.