मिठीच्या सफाईत कंत्रटदारांची चंगळ!
By admin | Published: July 12, 2014 12:40 AM2014-07-12T00:40:02+5:302014-07-12T00:40:02+5:30
श्यामनारायण ब्रदर्स कंपनीला 23.19 कोटी अदा करण्यात आल्याने त्यांची चंगळ सुरू असून, मिठी नदीच्या साफसफाईचे मात्र तीनतेरा वाजले आहेत.
Next
मुंबई : मिठी नदीच्या साफसफाईसाठी आरपीएफ इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेड लिमिटेड यांना 236.42 कोटी, रिलायन्स मिचिगन यांना 161.62 कोटी, युनिटीला 1क्5 कोटी, बीपीएल-बीबीसी यांना 1क्4.26 कोटी, डीबीएम जीओ टेक्निक यांना 78.9 कोटी, आरई इन्फ्राला 55.88 कोटी, राज कंपनीला 54.84 कोटी आणि श्यामनारायण ब्रदर्स कंपनीला 23.19 कोटी अदा करण्यात आल्याने त्यांची चंगळ सुरू असून, मिठी नदीच्या साफसफाईचे मात्र तीनतेरा वाजले आहेत.
मुंबई महापालिकेकडे मिठी नदीचा विहार तलाव ते सीएसटी पुलादरम्यानचा 11.8 किलोमीटर भाग आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे सीएसटी पूल ते माहीम कॉजवे असा 6 किलोमीटरचा भाग येतो. शिवाय वाकोला नाल्याचाही यामध्ये समावेश आहे.
महापालिकेच्या मिठी नदीच्या हद्दीतील खोलीकरण आणि रुंदीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शिवाय या कामासाठी पहिल्या टप्प्यात 28.97 कोटी आणि दुस:या टप्प्यात 573.89 कोटी रुपये खर्च झाले आहेत. संपूर्ण कामाचा अपेक्षित खर्च 1 हजार 239.6क् कोटी एवढा आहे. आणि हा प्रकल्प 2क्12 सालीच पूर्ण होणो अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पाला मुदतवाढ देण्यात आल्याने तो 2क्17 साली पूर्ण होणार आहे.
एमएमआरडीएच्या हद्दीतील कामासाठी पहिल्या टप्प्यात 34.5क् कोटी आणि दुस:या टप्प्यात 419.92 कोटी खर्च करण्यात आले आहेत. शिवाय रुंदीकरणाचे काम 9क् टक्के झाले असून, 3 हजार 96क् मीटर एवढय़ा सेवा रस्त्याचे काम झाले आहे. शिवाय 2 हजार 14क् मीटर एवढे काम शिल्लक आहे. महापालिका आणि एमएमआरडीएने आजवर 1क्.54 लाख घनमीटर गाळ काढल्याचा दावा केला आहे.
पालिकेने 5.68 लाख घनमीटर आणि एमएमआरडीएने 4.86 लाख घनमीटर गाळ काढला आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केंद्राकडे मिठी नदी प्रकल्पासाठी 1 हजार 657.11 कोटी एवढे आर्थिक साह्य मागितले आहे, मात्र अद्याप दमडीही मंजूर झालेली नाही. (प्रतिनिधी)
च्नुकतेच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मुंबईला डावलण्यात आले असून, मिठी नदी प्रकल्पाकडेही कानाडोळा करण्यात आला आहे.
च्मिठीच्या नदी प्रकल्पावर आजवर 1 हजार 57 कोटी रुपये खर्च झाले असून, हा संपूर्ण प्रकल्प 2क्17 साली पूर्ण होणार आहे. गेल्या नऊ वर्षापासून मिठी नदीचे काम संथगतीने सुरू आहे.