बंडखोरांपुढे नमली मातोश्री
By Admin | Published: September 30, 2014 11:28 PM2014-09-30T23:28:19+5:302014-09-30T23:28:19+5:30
गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात शिवसेना प्रथमच स्वपक्षीय बंडखोरांपुढे नमली आहे. आणि हा चमत्कार घडविणारे चारही बंडखोर ठाणो जिल्हय़ातील आहेत.
>ठाणो : गेल्या 48 वर्षाच्या इतिहासात शिवसेना प्रथमच स्वपक्षीय बंडखोरांपुढे नमली आहे. आणि हा चमत्कार घडविणारे चारही बंडखोर ठाणो जिल्हय़ातील आहेत. ठाण्यावर माझ विशेष प्रेम आहे. याच ठाण्याने शिवसेनेला तिचा पहिला नगराध्यक्ष वसंत मराठेंच्या रुपाने मिळवून दिला. 199क् च्या विधानसभा निवडणुकीत मोठय़ा संख्येने आमदार निवडून दिले. जनतेने निवडून दिलेला शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष सतिश प्रधानांच्या रुपाने दिला. म्हणून माङो ठाण्यावर विशेष प्रेम आहे. असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे. त्याच त्यांच्या प्रिय ठाण्याने त्याच शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेनेला स्वत:पुढे झुकविण्याचा चमत्कार घडवून दाखविला आहे. मी ज्याचा शेंदूर खरवडेल त्या देवाचा दगड होईल आणि ज्या दगडाला शेंदूर फासेल त्याचा देव होईल असे शिवसेना प्रमुख म्हणायचे व तसे करूनही दाखवायचे म्हणूनतर गणोश नाईकांसारख्या बडय़ा नेत्याला त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. बंडखोरांना एकच सजा असायची ती म्हणजे हकालपट्टी मग बंडू शिंगरे असोत, नाहीतर सेनेतले पहिले बंडखोर अॅड. बळवंतराव मंत्री असोत. अगदी तेव्हापासून ते अलिकडच्या काळापर्यत बंड म्हणजे हकालपट्टी, मातोश्रीचे दरवाजे कायमचे बंद असा या भगव्याचा दरारा होता. परंतु ठाणो जिल्हय़ातल्या तरे, थरवळ, म्हस्के यांनी मात्र आपण शिवसेनेत बंडही करू शकतो आणि मातोश्रीला नमवू शकतो, हे सिद्ध करून दाखविले. बाळासाहेब ठाकरे नेहमी चमत्कार घडविण्याचे भाषा करायचे असा चमत्कार शिवसेनेच्या इतिहासात या त्रिकुटाने घडवून दाखविला. यालाच म्हणतात राजकारणामध्ये ‘समय आया बाका तो इनकोभी कहो काका’ हेच खरे असते. मात्र मातोश्रीचा असलेला अॅडजेस्टमेंटचा पवित्र निवडणुकीनंतर कायम राहिल काय? या बंडामुळे सेनेचे उमेदवार पडले तर बंडखोरांना आज जे पदांचे रिवॉर्ड मिळाले ते टिकून राहिल काय? या प्रश्नांची उत्तरे मतमोजणीनंतर मिळणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)
4बंडखोर उपनेते अनंत तरे यांना मातोश्रीने दिले विधान परिषदेची आमदारकी देण्याचे आश्वासन
4यापूर्वी महापौरपद निवडणूकीत मतदानात गद्दारी करणा:या खोपकरांचा झाला होता ‘श्रीधर’
4डोंबिवलीचे शहरप्रमुख सदानंद थरवळ यांना उमेदवारी नाकारताच त्यांनीही केले होते बंड. त्यांना मातोश्रीवर बोलावून देण्यात आली जिल्हाप्रमुखपदाची महत्वाची सुभेदारी.
4ठाणो महानगरपालिकेत सभागृहनेते असलेल्या नरेश म्हस्केंची नाराजी दूर करण्यासाठी मातोश्रीने त्यांनाही बोलावून समजूत काढली व ठाणो जिल्हय़ाचे विभाजीत जिल्हाप्रमुखपद त्यांना दिले.