दीडशे काँग्रेस कार्यकर्ते मनसेत

By admin | Published: January 17, 2017 02:56 AM2017-01-17T02:56:10+5:302017-01-17T02:56:10+5:30

भांडुपमधील काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

Hundreds of Congress activists MNS | दीडशे काँग्रेस कार्यकर्ते मनसेत

दीडशे काँग्रेस कार्यकर्ते मनसेत

Next


मुंबई : भांडुपमधील काँग्रेसच्या दीडशे कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही प्रवेश प्रक्रिया पार पडली.
भांडुप एस वॉर्डमध्ये पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची स्वप्ने नाहिसे होत चालल्याने, विविध पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. अशातच भांडुपमधील १५० काँग्रेस कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. यामध्ये काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
यापैकी काही कार्यकर्त्यांना मनसेतून उमेदवारी मिळण्याची स्वप्ने दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे धाव घेतल्याचे समजते. मात्र, भांडुपमध्ये सद्यस्थितीत विद्यमान मनसे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यातच उमेदवारीसाठी शीतयुद्ध सुरू झाले आहे. त्यात या कार्यकर्त्यांपैकी कुणाला उमेदवारी मिळाल्यास त्यांना सामावून घेतले जाणार नसल्याचा सूरही उमटताना दिसत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of Congress activists MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.