नोकरीच्या शेकडो तरुणांची करोडोंची फसवणूक: आर्थिक गुन्हे शाखा करणार तपास
By admin | Published: August 24, 2016 09:37 PM2016-08-24T21:37:38+5:302016-08-24T21:37:38+5:30
नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा लवकरच
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 24 : नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कायमस्वरुपी नोकरीला लावून प्रशिक्षणाच्या नावाखाली ठाण्यासह देशभरातील सुमारे तीन हजार सॉफ्टवेअर अभियंत्यांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्रंनी दिली. यातील फरारी संचालकांचा शोध घेण्यात येत असून ते परदेशात पसार होण्याची शक्यता गृहीत धरुन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर ह्यलूक आऊट नोटीसह्ण बजावण्यात येणार आहे.
कामगारांना एक आठवडयाची सुटी देऊन त्यांना गाफील ठेवून या कंपनीचे यश सिंग, छाया सिंग आणि पंकजकुमार हे तिघे संचालक अचानक पसार झाले. ते परदेशात पसार होऊ नये म्हणून ही लूक आऊट नोटीस बजावण्याची प्रक्रीया सुरु केल्याची माहिती सूत्रंनी दिली. नामांकित संकेतस्थळावर ट्रेनी यातील अनेकांना ह्यसॉफ्टवेअर डेव्हलपर ट्रेनीह्ण या पदासाठी निवड झाल्याचे पत्र देऊन नंतर त्यांच्याकडून प्रत्येकी 25 हजार रुपये उकळण्यात आले. तर काहींना प्रशिक्षण भत्यापोटी सहा हजार रुपये देण्याचेही सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षभराने 25 हजारांची रक्कम परत करण्यात येणार होती
परंतू, नोकरीही मिळाली नाही आणि पैसेही परत न करता कंपनीच्या संचालकांनी अचानक पलायन केल्याने याप्रकरणी ठाण्यातील सुमारे 6क्क् तरुणांनी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली आहे. ठाण्यातील 600 तरुणांची दीड कोटींच्या सुमारास तर देशभरातील सुमारे अडीच ते तीन हजार तरुणांची सहा ते सात कोटींची फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे. या गुन्हयाची व्याप्ती मोठी असल्यामुळे तो तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव वागळे इस्टेट पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे तो लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी सांगितले.