साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

By admin | Published: October 4, 2014 02:23 AM2014-10-04T02:23:03+5:302014-10-04T02:23:03+5:30

साईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले

Hundreds of millions of devotees of Sai Puniyatithithi | साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

साई पुण्यतिथीला लाखोंची हजेरी

Next
>शिर्डी :  साईंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पारंपरिक भिक्षा झोळीच्या निमित्ताने शुक्रवारी साईच आपल्या दारी भिक्षेसाठी अवतरले या श्रद्धेतून शहरातील ग्रामस्थ व भाविकांनी पाऊणशे पोती धान्य व एकोणसाठ हजाराच्या रकमेचे दान भिक्षा झोळीत टाकल़े शुक्रवारी लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला़
त्रिसदस्यीय समितीचे सदस्य जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी आपले पद, प्रतिष्ठा विसरुन आत्मिक आनंद मिळवून देणा:या व अहंकार गळून पाडणा:या या कार्यक्रमात भिक्षा झोळी घेवून सहभागी झाले होत़े पहाटे साईप्रतिमेच्या व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाच्या मुख्य दिवसाचा श्रीगणोशा झाला़ 
द्वारकामाईत सुरू झालेल्या अखंड पारायण सोहळ्याची 
सांगता झाली़ यानंतर भिक्षा 
झोळीचा तर माध्यान्हीला जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते आराधना विधीचा कार्यक्रम झाला़  
साईबाबांच्या पुण्यतिथी निमित्त साईनगरी नटली आह़ेविविधरंगी फुलांनी सजवलेली,सुवर्णालंकाराने नटलेली,चित्ताकर्षक वस्त्रंनी लपेटलेली साईंची समाधीवरील मनमोहक मूर्ती भाविकांचे भान हरपवणारी आहे. रात्री नऊ वाजता शहरातून साईंची सुवर्ण रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of millions of devotees of Sai Puniyatithithi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.