चिंचेची झाडे तोडल्याने शेकडो बगळ्यांचा मृत्यू

By admin | Published: August 3, 2015 12:46 AM2015-08-03T00:46:35+5:302015-08-03T00:46:35+5:30

बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या

Hundreds of thickets have died due to the breaking of tamarind trees | चिंचेची झाडे तोडल्याने शेकडो बगळ्यांचा मृत्यू

चिंचेची झाडे तोडल्याने शेकडो बगळ्यांचा मृत्यू

Next

चंद्रपूर : बल्लारपूर तालुक्यातील दहेली येथे पाखरांचा अधिवास असलेली चिंचेची नऊ झाडे तोडण्यात आल्याने शेकडो बगळे मृत्युमुखी पडले, तर बेघर झालेल्या बगळ्यांच्या तेवढ्याच पिल्लांना वन विभाग आणि ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी मुक्त केले आहे.
गावकऱ्यांना बगळ्यांच्या विष्ठेच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो म्हणून दहेली ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर गावातील चिंचेची झाडे तोडली. मात्र त्यासाठी वन विभागाची पूर्वपरवानगी न घेतल्याने आता दहेली ग्रामपंचायत वन कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
झाडे तोडल्याने बेघर झालेल्या बगळ्यांच्या शेकडो पिल्लांची जमिनीवर इकडे तिकडे केविलवाणी भटकंती सुरू होती. शनिवारी सकाळी बल्लारपूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी वडेट्टीवार यांच्यासह वन कर्मचारी व ईको-प्रोच्या कार्यकर्त्यांनी गावात जाऊन झाडे तोडण्याचे काम बंद पाडले. (प्रतिनिधी)

Web Title: Hundreds of thickets have died due to the breaking of tamarind trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.