विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची हजेरी
By Admin | Published: September 15, 2016 12:55 PM2016-09-15T12:55:30+5:302016-09-15T12:55:30+5:30
नवसाला पावणा-या विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 15 - येथील नवसाला पावणा-या विघ्नहर्ता चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. मंदिरापासून दीड किमी अंतरापर्यंत रांगा आहेत. दरवर्षी अनंत चतुर्दशीला या मंदिरात नवसाचे मोदक वाटप केले जातात. यंदा दीड लाख मोदक वाटप होणार आहेत. गतवर्षी सव्वा लाख मोदकांचं वाटप करण्यात आले होते.
सकाळी साडे पाच वाजता मंदिरापासून कावड निघाली. शेकडो भाविकांनी कयाधू नदीवर विधीवत पूजा करून पाणी घेतले. नंतर श्रींचा जलअभिषेक झाला. महाआरतीनंतर दर्शन रांगा व मोदक वाटप सुरू झाले.गड्डेपीर गल्लीत असलेल्या या मंदिरापासून गांधी चौकापर्यंत रांगा लागलेल्या होत्या.
आलेल्या भाविकांमुळे शहरात एकच गर्दी झाली होती. बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे मोफत ऑटोसेवा होती. विविध धार्मिक व सवयंसेवी संघटनांनी अन्नछञ उभारले होते .तर अनेकांनी पाण्याचे पाऊच मोफत वाटले. नवस पूर्ण झालेले भाविक मोदक घेऊन आले होते. दर्शनानंतर त्यांनी ते प्रसाद म्हणून वाटले. महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. पार्किंगची व्यवस्था रामलीला मैदान व एनटीसी मैदान येथे केली होती.