स्वातीच्या आत्महत्येने मिळाली हजारो विद्यार्थ्यांना एसटीत सवलत

By admin | Published: October 29, 2015 01:13 AM2015-10-29T01:13:21+5:302015-10-29T01:13:21+5:30

एसटीच्या पाससाठी पैसे नसल्याचे दु:ख उराशी बाळगत स्वाती पिटलेने केलेल्या आत्महत्येमुळे द्रवलेल्या शासनाने आता मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी

Hundreds of thousands of students have got self-resident relief | स्वातीच्या आत्महत्येने मिळाली हजारो विद्यार्थ्यांना एसटीत सवलत

स्वातीच्या आत्महत्येने मिळाली हजारो विद्यार्थ्यांना एसटीत सवलत

Next

मुंबई : एसटीच्या पाससाठी पैसे नसल्याचे दु:ख उराशी बाळगत स्वाती पिटलेने केलेल्या आत्महत्येमुळे द्रवलेल्या शासनाने आता मराठवाड्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत एसटी प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
१ नोव्हेंबरपासून १५ मार्च २०१६ पर्यंत ही ‘स्वाती अभय योजना’ लागू असेल. परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. यामुळे राज्याच्या तिजोरीवर ९ कोटी १८ लाख ६० हजार रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
मंत्रिमंडळाने परवानगी दिल्यास अन्य दुष्काळग्रस्त भागांतही ही योजना राबवली जाईल असेही रावते यांनी सांगितले. राज्यभरात सव्वा कोटी विद्यार्थ्यांना भाड्याच्या एक तृतियांश पैसे घेऊन पास दिला जातो. मराठवाड्यात उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या ४ लाख ६० हजार आहे.

Web Title: Hundreds of thousands of students have got self-resident relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.