१६ लाख जनावरांची भूक निसर्गावर

By admin | Published: July 7, 2014 10:28 PM2014-07-07T22:28:48+5:302014-07-07T22:28:48+5:30

पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट

The hunger of 16 lakh animals on nature | १६ लाख जनावरांची भूक निसर्गावर

१६ लाख जनावरांची भूक निसर्गावर

Next

मेहकर : पश्‍चिम वर्‍हाडावर चारा टंचाईचे संकट घोंघावत असून, त्यामुळे पशूपालक अडचणीत आले आहेत. पश्‍चिम वर्‍हाडात जवळपास १६ लाख गुरं-ढोरं असून, जेमतेम जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा शिल्लक असल्याने, त्यानंतर या मुक्या जिवांचे पोट निसर्गावर अंबलंबून राहणार आहे.
पावसाअभावी पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तिन्ही जिलंवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाच्या झळा आता मुक्या जनावरांनाही सोसाव्या लागत आहेत. राना-वनात जनावरांसाठी चारा फारसा राहिलेला नाही. त्यामुळे चार्‍यासाठी जनावरांची, तर पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची भटकंती सुरू आहे. पश्‍चिम वर्‍हाडात एकूण १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरे आहेत. त्यापैकी अकोला जिलत २ लाख ७७ हजार ८८१ आणि वाशिम जिलत ३ लाख ४ हजार ३४७ जनावरे आहेत. बुलडाणा जिलत मेंढय़ा १ लाख २९ हजार ८३९, शेळ्या २ लाख ६७ हजार ४५१ व इतर जनावरे ६ लाख १६ हजार ३९८ आहेत. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात एकूण १0 लाख १३ हजार ६८८ एवढे पशुधन आहे. वाशिम जिलत २ लाख ४१ हजार ८६२ मोठी जनावरे असून, ६२ हजार ७८१ लहान जनावरे आहेत. मोठय़ा जनावरांना दिवसाकाठी सुमारे ७ किलो कोरडा चारा लागतो. छोट्या जनावरांना जवळपास ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो.
पश्‍चिम वर्‍हाडात जेमतेम जुलै अखेरपर्यंत पुरेल, एवढाच चारा उपलब्ध आहे. साठवून ठेवलेला चारा संपल्याने पशुपालक मिळेल त्या भावात चारा खरेदी करीत आहेत. मार्च महिन्यात गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, चार्‍याची मोठय़ा प्रमाणात नासाडी झाली होती. त्यामुळे चार्‍याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जुलै अखेरपर्यंत दमदार पाऊस न झाल्यास, पश्‍चिम वर्‍हाडात चारा विकत मिळणेही अवघड होणार आहे. या चारा टंचाईमुळे पश्‍चिम वर्‍हाडातील १५ लाख ९५ हजार ९१६ जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी अशी वेळ येण्या आधी प्रशासनाने पुर्व तयारी करण्याची गरज आहे.
**दुधाळ जनावरंही धोक्यात
अनेक शेतकर्‍यांजवळ दूध देणार्‍या गायी, म्हशी असल्याने या जनावरांना हिरवा चारा आवश्यक असतो; परंतू पाणीच नसल्याने हिरवा चारा मिळणे अवघड झाले आहे. दुधाळ जनावरांना हिरवा चारा न मिळाल्यास दुधाचाही तुटवडा निर्माण होईल.

Web Title: The hunger of 16 lakh animals on nature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.