अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच पतीची आत्महत्या; अन्वय नाईक यांच्या पत्नीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 01:38 PM2020-11-04T13:38:59+5:302020-11-04T13:43:59+5:30
'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा माझा पती आज जिवंत असला असता, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.'
मुंबई - रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सकाळी रायगडपोलिसांनी अटक केली. २०१८ मध्ये इंटिरियर डिझानयर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता, 'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.
अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता.
Anvay Naik : अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा
आम्ही एक नागरिक म्हणून, पोलिसांवर विश्वास ठेऊन एफआयआर करतो आणि ती कचऱ्याच्या डब्ब्यात का जाते? असा सवालही यावेळी अन्वय यांच्या पत्नीने केला. यावेळी, माझ्या वडिलांना सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या, की तुला पैसे मिळणारच नाही आणि जे मिळाले आहेत, तेही मी कसे वसूल करतो, हे मी बघून घेईल. यासंदर्भात आमच्या कुटुंबातही चर्चा व्हायची. मी माझ्या वडिलांना पोलिसांत तक्रारही करायला सांगत होते. पण तेव्हाही माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या, की तुझ्या मुलीचे आणि तुझेही करिअर बर्बाद करीन. त्यांना सातत्याने प्रेशरमध्ये आणले गेले. एवढेच नाही, तर आमच्या क्लायंट्सनाही त्यांनी फूस लावली, की तुम्हीही पैसे देऊ नका. हे आम्हाला फिरोजनेही सांगितले. त्यामुळे माझ्या वडिलांकडे दुसरा पर्यायच उरला नाही, असे अन्वय यांच्या मुलीने म्हटले आहे.
Arnab Goswami Arrested: अर्णब गोस्वामींच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा काय घडलं?...पाहा Video
iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Flokmat%2Fvideos%2F358641521862353%2F&show_text=0&width=560" width="560" height="315" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true">
याशिवाय, या प्रकरणात अनिल पारसकर आणि सुरेश वहाडे यांनीही अर्णब गोस्वामी यांना सहकार्य केल्याचेही त्या म्हणाल्या. अर्णब यांना आज दुपारी अलिबाग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
"गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"
अर्णब आणि अन्वय यांच्यात कशावरून वाद झाला?
अर्णब गोस्वामी यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीला रामराम केला. मी सहा महिन्यांत माझी नवी वाहिनी सुरू करेन, असं आव्हान गोस्वामींनी टाईम्स नाऊमधून बाहेर पडताना जैन यांना दिलं होतं. एखादी वाहिनी सुरू करण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो. पण गोस्वामी यांनी ६ महिन्यांत वाहिनी सुरू करता यावी यासाठी अन्वय नाईक यांच्यामागे स्टुडियोचं काम लवकर पूर्ण करण्याचा तगादा लावला. अन्वय यांना ६ महिन्यांत काम पूर्ण न करता आल्यानं अर्णब यांनी त्यांच्याकडे असलेलं काम काढून घेतलं. त्यांना स्टुडिओच्या परिसरात येण्यासही मज्जाव केला. यानंतर गोस्वामींनी स्टुडिओचं काम कोलकात्यातील एका इंटिरियर डिझाईनरकडून पूर्ण करून घेतलं, अशी माहिती सुत्रांनी दिली.