पत्नीनेच दिले पतीला विष
By Admin | Published: July 1, 2016 08:47 PM2016-07-01T20:47:57+5:302016-07-01T20:47:57+5:30
जन्मोजन्मी हाच पती मिळावा व आयुष्यभर पतीची सोबत राहावी, यासाठी वटपौर्णिमेला व्रत करणाऱ्या महिला आजही पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे पती पसंत नाही म्हणून एका
पळसपाणी येथील घटना : पतीचा मृत्यू, पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल
साकोली (भंडारा) : जन्मोजन्मी हाच पती मिळावा व आयुष्यभर पतीची सोबत राहावी, यासाठी वटपौर्णिमेला व्रत करणाऱ्या महिला आजही पाहायला मिळतात. मात्र दुसरीकडे पती पसंत नाही म्हणून एका महिलेने आपल्या पतीला जेवनातून विष दिले. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना साकोली तालुक्यातील पळसपाणी येथे गुरूवारच्या रात्री घडली.
हरिकिसन मोतीराम राऊ त (२८) रा.पळसपाणी असे मृतकाचे नाव असून प्रभा हरिकिसन राऊ त (२३) असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
हरिकिसन व प्रभा यांचा विवाह ११ मे २०१६ रोजी रितीरिवाजाप्रमाणे झाला. विवाहानंतर प्रभा व हरिकिसन यांचे वारंवार भांडण व्हायचे. बुधवारला रात्री ६.३० वाजेदरम्यान हरिकिसनची प्रकृती अचानक बिघडली. त्याला साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हरिकिसनचा गुरूवारला मृत्यू झाला.
याप्रकरणी हरिकिसनचे वडील मोतीराम राऊत यांनी साकोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलाला त्याच्या पत्नीनेच विष दिल्याने मुलाचा मृत्यू झाला. या तक्रारीवरुन पोलिसांनी प्रभाला ताब्यात घेतले. प्रारंभी ती नाहीचा पाढा वाचत असताना पोलिसांनी हिसका दाखविताच तिने कबुली दिली. घटनेच्या दिवशी २९ जूनच्या दुपारी २ वाजेदरम्यान हरिकिसनला जेवनात विष दिल्याचे सांगितले. यावरुन साकोली पोलिसांनी प्रभाविरुद्ध भादंवि ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जी.एन. खंडाते करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी )