प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह चौघांना जन्मठेप

By Admin | Published: September 27, 2016 05:43 PM2016-09-27T17:43:04+5:302016-09-27T17:43:04+5:30

मनोज भाबटसह तिचा प्रियकर प्रमोद रणनवरे व त्याचे सहकारी आशिष कथले तसेच नितीन घाडगे सर्व रा. यवतमाळ या चार जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Husband murders with the help of a boyfriend; Life imprisoned for four persons with wife | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह चौघांना जन्मठेप

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या; पत्नीसह चौघांना जन्मठेप

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. 27 - प्रेमसंबंधात अडसर ठरलेला पती मनोज भाबट रा. यवतमाळ याची आपल्या प्रियकराकरवी हत्या केल्याप्रकरणी पत्नी मोनिका मनोज भाबटसह तिचा प्रियकर प्रमोद रणनवरे व त्याचे सहकारी आशिष कथले तसेच नितीन घाडगे सर्व रा. यवतमाळ या चार जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी मंगळवारी दिला. या बाबत थोडक्यात हकीकत, आॅक्टोबर २०१३ मध्ये देवळी तालुक्यातील वाबगाव शिवारातील कुजलेला मृतदेह आढळला. या प्रकरणी देवळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृतदेहावर अनेक जखमा होत्या. तपासाअंती त्याची ओळख
पटली असता तो यवतमाळ येथील असून त्याचे नाव मनोज भाबट असल्याचे समोर आले.
शिवाय तो राज्य राखीव दलाचा कर्मचारी असल्याचेही तपासात उघड झाले. शरीरावरील जखमांवरून हत्येचा संशय आल्याने देवळीचे तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. यात मनोजच्या पत्नीनेच प्रियकराच्या सहायाने त्याची हत्या केल्याचे समोर आले.
या सर्व घटनाक्रमावरून तत्कालीन ठाणेदार सायरे यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनात तपास पूर्ण करून पत्नी मोनिका भाबट, प्रमोद रणनवरे, अशिष कथले व नितीन घाडगे या चारही जणांवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, २०१ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. सदर प्रकरण तपासाअंती न्यायालयात हजर केले असता त्यावर मंगळवारी निकाल देण्यात आला. यात चारही आरोपींना कलम ३०२, ३६४ अन्वये जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिकत करावास तसेच कलम २०१ अन्वये ३ वर्षे कारवास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
न्यायालयात सदर प्रकरणी शासनाच्यावतीने प्रारंभी तत्कालीन सरकारी वकील श्याम दुबे यांनी प्रकरण चालविले. याच प्रकरणात तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अनुराधा सबाणे यांनी युक्तीवाद केला. सदर प्रकरण निकालावर आले असता
सरकारी वकील विनय घुडे यांनी प्रकरण पुढे नेत शिक्षेकरिता युक्तिवाद केला.

वाहनातच केली हत्या

मनोज हा राज्य राखीव दलाचा कर्मचारी होता. याच काळात त्याने यवतमाळ येथे घर घेतले. या घरी तो पत्नी मोनिकासह राहत होता. मात्र नोकरीच्या कारणाने तो घरी कमी व बाहेरच जास्त असायचा. मोनिका घरी एकटीच असल्याने तिचे परिसरातील प्रमोद रणनवरे याच्याशी प्रेम संबंध जुळले. याची माहिती मनोजला मिळताच या दोघांत वाद सुरू झाले. या वादातूनच मोनिकाने प्रियकराच्या मदतीने मनोजच्या हत्येचा कट रचला. यवतमाळ मार्गावर कळंब नजीक असलेल्या घाटात प्रमोदने आशिष कथले व नितीन घाडगे या दोघांंच्या सहकार्याने मनोजची वाहनातच हत्या केली. त्याचा पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह देवळी तालुक्यातील वाबगाव येथे आणून टाकला.

Web Title: Husband murders with the help of a boyfriend; Life imprisoned for four persons with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.