पत्नी व मुलीची हत्या करून पती पोलिसांच्या स्वाधीन

By admin | Published: July 28, 2016 12:35 PM2016-07-28T12:35:07+5:302016-07-28T12:35:23+5:30

कौटुंबिक कालहातून पतीने पत्नी व २ महिन्यांच्या मुलीची हत्या केल्या घटना वर्धा येथे घडली.

Husband murders wife and daughter, husband gets transferred to police | पत्नी व मुलीची हत्या करून पती पोलिसांच्या स्वाधीन

पत्नी व मुलीची हत्या करून पती पोलिसांच्या स्वाधीन

Next

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. २८ -  कौटुंबिक कालहातून पतीने लोखंडी मुसळाने ठेचून पत्नीची हत्या केली. यानंतर 2 महिन्याच्या चिमुकलीला गळा आवळून ठार करून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. ही थरारक घटना आज सकाळी 7 वाजता समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथे उघडकीस आली. कल्याणी निखिल शेलोरे(22) व मुलगी स्वरा (2 महिने) अशी मृतकांची नावे आहेत. आरोपी पती निखिल सदाशिव शेलोरे(30) याने स्वतःला गिरड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला भादनवीच्या कलम 302 अन्वये अटक केली.

कल्याणीचे वडील दिवाकर कापसे हे मूळचे गिरडचेच परंतु, ते चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे शिक्षक असल्याने तेथेच राहत होते. कल्याणी गिरडला आजीकडे कधी कधी येत होती. अशातच तिचे निखीलसोबत प्रेम संबंध जुळले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. मात्र काही कालावधीनंतर त्यांच्यात खटके उडायला लागले. प्रकरण महिला तक्रार निवारणकडे सुरु आहे. दोन महिन्यांपूर्वी या कुटुंबात मुलगी जन्माला आली. बुधवारी कल्याणी चिमूर येथून वडिलांकडून गिरडला आली. सायंकाळी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाल्याचे बोलले जात आहे. भांडण विकोपाला गेले. अशातच राग अनावर झाल्याने निखिलने पत्नी कल्याणी व चिमुकल्या स्वराची हत्या केल्याचे बोलले जात आहे. हिंगणघाटचे उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचा तपास गिरडचे ठाणेदार सुखराम थोटे करीत आहे. कल्याणीच्या हत्येला तिचे सासू, सासरे व दीर कारणीभूत असून त्यांनाही अटक करावी, अशी मागणी कल्याणीचा भाऊ स्वप्नील कापसे यांनी केलीआहे.

Web Title: Husband murders wife and daughter, husband gets transferred to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.