कल्याणमध्ये पत्नी आणि मुलींची हत्या करुन पतीची आत्महत्या
By admin | Published: February 1, 2016 10:16 AM2016-02-01T10:16:14+5:302016-02-01T10:37:27+5:30
कल्याण येथील म्हारळ गावामध्ये एका इसमाने पत्नी आणि आपल्या दोन मुलींची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या करुन जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. १ - कल्याण येथील म्हारळ गावामध्ये एका इसमाने पत्नी आणि आपल्या दोन मुलींची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या करुन जीवन संपवल्याने एकच खळबळ उडाली आहे. म्हारळ गावातील मोहन टॉवर या इमारतीत रणजित यशवंतराव (४५) पत्नी स्वाती (३८) आणि दोन मुली श्रध्दा, आर्यासोबत रहात होते.
त्यांनी आधी पत्नी आणि मुलींची हत्या केली नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. रणजित यांनी चार ते पाच दिवसांपूर्वी शेजारी आणि नातेवाईकांना शेगावला जात असल्याचं सांगितलं होतं.
रणजित यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजा-यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर चारही जण मृतावस्थेत आढळले. रणजित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला होते. रणजीत यांनी हे टोकाच पाऊल का उचललं ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांना खोलीमध्ये आत्महत्येची कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही.