आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Published: April 11, 2017 05:56 PM2017-04-11T17:56:59+5:302017-04-11T17:56:59+5:30

शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला.

Husband's suicide by killing wife by tearing illness | आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

आजारपणाला कंटाळून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Next

ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. 11 : शहरातील साई रोड परिसरात राहणाऱ्या हरिश्चंद्र संगाप्पा अकनगिरे (७५) यांनी आजारपणाला कंटाळून आपली पत्नी कालिंदाबाई हरिश्चंद्र अकनगिरे (६०) यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास राहत्या घरी घडली.
मूळचे रेणापूरचे असलेले अकनगिरे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून आर्वी येथे वास्तव्यास आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हरिश्चंद्र आकनगिरे आणि कालिंदाबाई हे दाम्पत्य आजारी होते. या आजारपणामुळे दोघेही त्रस्त होते. पहाटेच्या वेळी मुलगा धर्मपाल हरिश्चंद्र अकनगिरे हे आपल्या पत्नी व मुला-बाळांसह हनुमान जयंतीनिमित्त नजिकच्या मंदिरात पहाटे गुलाल उधळण्याच्या कार्यक्रमाला गेले होते. दरम्यान, इकडे घरी हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेच होते. यावेळी पत्नी कालिंदाबाई यांचा गळा आवाळून पती हरिश्चंद्र यांनी खून केला. त्यानंतर स्वत: छताच्या कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा आणि सून घरी आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुलगा धर्मपाल अकनगिरे यांनी आर्वी गावचे दहा वर्षे सरपंच म्हणून काम केले आहे. सध्या ते ग्रामपंचायत सदस्य आहेत. या कुटुंबात कुठलाही ताण तणाव अथवा वाद नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अशा कौटुंबिक वातावरणात हा प्रकार घडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.
रात्रीच गप्पा झाल्या...
सोमवारी रात्रीच्या भोजनानंतर मुलगा, सून आणि हरिश्चंद्र व कालिंदाबाई यांच्यामध्ये गप्पा झाल्या. तसा कुठलाही तणाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला नाही. घरात आनंदी वातावरण होते. अशा वातावरणात ही घटना घडल्यामुळे मुलगा धर्मपाललाही धक्का बसला आहे.
आजारपणाला कंटाळून केले कृत्य?
हरिश्चंद्र आणि कालिंदाबाई हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होते. दरम्यान, या आजारपणाला कंटाळून हरिश्चंद्र अकनगिरे यांनी आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला असावा, असा संशय पोलीस आणि कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

Web Title: Husband's suicide by killing wife by tearing illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.