पत्नीच्या माजी प्रियकरावर पतीचा अनैसर्गिक अत्याचार

By admin | Published: November 19, 2016 02:42 AM2016-11-19T02:42:27+5:302016-11-19T02:42:27+5:30

लग्नानंतरही पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड तिला मेसेज करतो, भेटण्यासाठी बोलावतो. म्हणून त्याला धडा शिकविण्यासाठी पतीने विकृत शक्कल लढवली.

Husband's unnatural torture on his wife's ex-boyfriend | पत्नीच्या माजी प्रियकरावर पतीचा अनैसर्गिक अत्याचार

पत्नीच्या माजी प्रियकरावर पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Next

मनीषा म्हात्रे,

मुंबई- लग्नानंतरही पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड तिला मेसेज करतो, भेटण्यासाठी बोलावतो. म्हणून त्याला धडा शिकविण्यासाठी पतीने विकृत शक्कल लढवली. त्याने ३२ वर्षांच्या बॉयफ्रेण्डचे अपहरण करत चाकूच्या धाकात तब्बल चार तास त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची विचित्र घटना गुरुवारी एलटी मार्गमध्ये उघड झाली. सुरेश एडगे असे त्याचे नाव असून, त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षांच्या तक्रारदार तरुणाने बुधवारी रात्री साडे आठच्या सुमारास येथील चिरा बाझार परिसरातून टॅक्सी पकडली. हा तरुण टॅक्सीमध्ये बसताच काही अंतर पुढे गेल्यानंतर टॅक्सीत आणखी काही जण बसले. चाकूच्या धाकाने धमकावत एडगेने अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. अत्याचाराचा व्हीडीओसुद्धा काढून तो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत तब्बल चार तास त्याने या तरुणावर अत्याचार सुरू ठेवले. गिरगाव ते वडाळा या प्रवासादरम्यान हा प्रकार सुरू होता. रात्री पावणे एकच्या सुमारास त्याला वडाळा परिसरात उतरवून त्याने पळ काढला. तरुणाने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देत, थेट लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तेव्हा या विकृत पतीचे बिंग फुटले. मुळात एडगेच्या लग्नाला दीड वर्ष झाले. लग्नानंतरही तक्रारदार तरुणाचे पत्नीला येत असलेल्या मेसेजमुळे तो वैतागला होता. त्यात तो पत्नीचा एक्स बॉयफ्रेण्ड असल्याचे समजताच तो आणखी चिडला. तापट स्वभावाच्या असलेल्या एडगेने त्याला धडा शिकविण्यासाठी मित्रांच्या मदतीने त्याच्या अपहरणाचा डाव आखला; आणि चाकूच्या धाकात त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले.
घटनेची माहिती मिळताच एलटी मार्ग पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी त्यांनी विकृत पतीविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, मारहाण, धमकावणे, संघटित गुन्ह्यांच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.

Web Title: Husband's unnatural torture on his wife's ex-boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.