पतीदेखत पत्नीवर दरोडेखोरांचा सामूहिक अत्याचार !
By Admin | Published: September 12, 2015 02:02 AM2015-09-12T02:02:09+5:302015-09-12T02:02:09+5:30
बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक म्हणून काम करीत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर
सातारा : बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर सुरक्षारक्षक
म्हणून काम करीत असलेल्या दाम्पत्याच्या झोपडीवर १० ते १२ जणांनी शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा टाकला. घरात लुटालूट केल्यानंतर जाताना तीन दरोडेखोरांनी पतीला जिवे मारण्याची धमकी देत पत्नीवर सामूहिक अत्याचार केला. दरोडेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.
सातारा-कोरेगाव रस्त्यावर एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
त्या बांधकामावर सुरक्षारक्षक म्हणून एक दाम्पत्य नेमले आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास कोणीतरी दरवाजा ठोठावला. त्यामुळे पतीने खिडकीतून बाहेर पाहिले असता सात ते आठ लोक होते. त्यांच्या हातात काठ्या, चाकू, गज होते. ‘दरवाजा उघडा. घरात काय असेल ते द्या; अन्यथा तुम्हाला सोडणार नाही,’ असे म्हणून काही दरोडेखोरांनी खिडकीच्या काचा फोडल्या.
त्यानंतर खिडकीतून आत हात घालून त्यांनी कडी काढली आणि घरात शिरून पतीला चाकूचा धाक दाखवून एका जागेवर बसविले. त्यानंतर पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र, तसेच त्याच्या पँटच्या खिशातील दीड हजारांची रोकड त्यांनी काढून घेतली. त्यानंतर पतीच्या गळ््यावर चाकू ठेवून तिघांनी पत्नीवर सामूहिक अत्याचार केला.
पीडित दाम्पत्याने संबंधित घरमालकाला फोन करून या
प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची धावाधाव सुरू झाली. पोलिसांनी नाकाबंदी करून दरोडेखोरांना शोधण्याचा प्रयत्न
केला. मात्र, तो निष्फळ ठरला. (प्रतिनिधी)
हॉटेलमध्येही चोरी
दरोडेखोरांनी तेथून जवळच असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या हॉटेलमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये असलेल्या कोल्ड्रिंक्सच्या सर्व बाटल्या रिकाम्या केल्या. तसेच जाताना त्यांनी हॉटेलमधील सिलिंडर, शेगडी, टिकाव, खोरे असे साहित्य चोरून नेले.
दरोडेखोर बोलत होते तीन भाषा
सर्व दरोडेखोर २० ते २५ वयोगटांतील होते. आपापसांत ते हिंदी, मराठी आणि कन्नड भाषा बोलत होते. त्यांनी तोंडाला काळे रुमाल बांधले होते. पीडित महिलेने सांगितलेल्या वर्णनावरून दरोडेखोरांचे स्केच बनविण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.