हुसेन जमादार यांची आत्महत्या
By admin | Published: October 23, 2015 01:59 AM2015-10-23T01:59:15+5:302015-10-23T01:59:15+5:30
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाईचारा संघटनेचे अध्यक्ष हुसेन जमादार यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ६७ वर्षांचे होते.
कोल्हापूर : मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाईचारा संघटनेचे अध्यक्ष हुसेन जमादार यांनी गुरुवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ६७ वर्षांचे होते. पुरोगामी मुस्लीम चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान आहे.
जमादार यांनी हुसेन दलवाई यांच्या सोबत मुस्लीम पुरोगामी समाजासाठी काम सुरू केले होते. मुस्लीम समाजातील तलाक पीडित महिलांसाठी मदत केंद्रही त्यांनी सुरू केले होते. या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ते करीत होते. एड्स प्रबोधनासाठी जनजागृती केंद्र जमादार यांनी सुरू केले होते. दोन वर्षापूर्वी मुस्लीम सत्यशोधक मंडळाला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाईचारा ही संघटना सुरू केली होती. मुस्लीम समाजाकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या वर्षभरापासून ते निराश होते. त्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. (प्रतिनिधी)