‘हास्यकल्लोळ’!
By admin | Published: February 13, 2016 10:25 PM2016-02-13T22:25:39+5:302016-02-13T22:25:39+5:30
फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. कारण १४ फेब्रुवारीला असतो तरुणाईचा स्पेशल ‘व्हॅलेंटाइन डे.’ याच व्हॅलेंटाइनवर सध्या व्हॉट्स अॅप, वी चॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर
- मितेश जोशी, मुंबई
फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना. कारण १४ फेब्रुवारीला असतो तरुणाईचा स्पेशल ‘व्हॅलेंटाइन डे.’ याच व्हॅलेंटाइनवर सध्या व्हॉट्स अॅप, वी चॅट आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर जोक्सफिरत आहेत. तरुणाई या जोक्सची कट्ट्यावर जोरदार खिल्ली उडवत आहेत.
‘सर्व मुलींसाठी अनुरोध.. १४ फेब्रुवारीपर्यंत आपापल्या बॉयफ्रेंडवर विशेष नजर ठेवा, नाहीतर नजर हटली तर सवत पटली..’, ‘तो बोलला मी तुला लाइक करतो... मग ती म्हणाली, घाबरतोस कशाला, लाइक करतोस, मग कमेंटपण करत जा’, ‘व्हॅलेंटाइन तो बच्चे मनाते है, अपनीवाली तो डायरेक्ट वटपौर्णिमा मनाएगी’ आणि ‘प्रत्येक आईला वाटते की, तिला सून चांदण्यासारखी लखलखणारी मिळो, भलेही इकडे स्वत:चा पोरगा ‘ख्रिस गेल’ का असेना..’ अशा मेसेजेसचे सध्या सोशल मीडियावर उधाण
आले आहे. ‘व्हॅलेंटाइन वीक’च्या प्रत्येक दिवसाप्रमाणे फोटो आणि मेसेजेस करून शुभेच्छा देण्याचा ट्रेंड दिसून येतोय. काही प्रसिद्ध कवींच्या चारोळी सोशल मीडियावर शेअर होताहेत. याचप्रमाणे, बॉलीवूडमधील सुपरहिट कपल्सचे रोमँटिक डायलॉग्स स्टेट्स म्हणून ठेवण्याकडेही तरुणाईचा कल आहे.