जीव्हीकेवर झोपडीधारकांचा मोर्चा

By Admin | Published: September 20, 2016 02:27 AM2016-09-20T02:27:33+5:302016-09-20T02:27:33+5:30

एक लाख झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएकडून याठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे.

Hutmaker's Front on GVK | जीव्हीकेवर झोपडीधारकांचा मोर्चा

जीव्हीकेवर झोपडीधारकांचा मोर्चा

googlenewsNext


मुंबई : विमानतळाच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या सुमारे एक लाख झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएकडून याठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे. मात्र या सर्वेक्षणाला विरोध दर्शवण्यासाठी विमानतळ झोपडपट्टी कृती समितीच्या वतीने सहारगाव ते सांताक्रूझ आंतरदेशीय विमानतळाजवळील जीव्हीके कंपनीवर झोपडीधारकांनी मोर्चा काढला होता.
मोर्चामध्ये आमदार अनिल परब, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे, माजी आमदार कृष्णा हेगडे, नगरसेवक प्रमोद सावंत, नगरसेवक विनी डिसोझा, माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, वॉचडॉग फाऊंडेशनचे संचालक निकोलस अल्मेडा, ग्राँडफे पिमेंटा, मनसेचे संदीप दळवी आदी सामील झाले होते.
दरम्यान, राज्य सरकारच्या आदेशानुसार पोलिस संरक्षणात येथील १४ विभागांत विखुरलेल्या सुमारे १ लाख झोपडपट्टीवासियांचे आणि येथील गावठाणांच्या जागेत असलेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू आहे.
>झोपडपट्टीधारकांच्या मागण्या
५०० चौरस फुटांचे घर
झोपडपट्टी आणि गावठाणांना पात्र-अपात्र निकष लावू नये
विमानतळाच्या जागेवरच सर्व झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करावे
सहार उन्नत मार्गाच्या पुनर्वसनाच्यावेळी अपात्र झालेल्या ३५० झोपडपट्टीधारकांना पात्र करा आणि त्यांना हक्काचे घर द्या.

Web Title: Hutmaker's Front on GVK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.