बीकेसीत धावणार हायब्रिड बस
By admin | Published: June 9, 2017 05:41 AM2017-06-09T05:41:09+5:302017-06-09T05:41:09+5:30
महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात नव्याने बस सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे.
मुंबई- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे वांद्रे-कुर्ला संकुलात नव्याने बस सेवा कार्यान्वित करण्यात येणार आहे. नव्या बसचे कार्यान्वय बेस्टकडून रोज केले जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल हे व्यापारी केंद्र आहे. परिणामी, येथील गर्दी वाढतच आहे. यावर उपाय आणि परिसराला साजेशी ‘हायब्रिड बस सेवा’ येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे. एमएमआरडीए, टाटा आणि बेस्टने गुरुवारी येथे पहिल्या हायब्रिड बसचे पर्यवेक्षण केले. एकूण २५ बस येथे चालविल्या जाणार आहेत. तांत्रिकदृष्ट्या ही बस मजबूत आहे. टाटाकडून महिन्याला पाच बसेस दिल्या जाणार आहेत.
बसची आसन क्षमता ३१ असून, २८ प्रवासी उभे राहू शकणार आहेत. या बसचे भाडे कमीतकमी १५ आणि जास्तीतजास्त २५ रुपये असणार आहे. या बसेस वांद्रे-कुर्ला संकुलात धावणार असून, विविध कार्यालयांमध्ये जाणे नागरिकांसाठी या बसेसमुळे काही अंशी का होईना, सुखकर होण्यास मदत होणार आहे.