Hyderabad Case: 'सरकारने पोलिसांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहायला हवं; एन्काऊंटरची फाईल बंद करावी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 11:03 AM2019-12-06T11:03:09+5:302019-12-06T12:19:23+5:30
पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळालं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे
मुंबई/सोलापूर - हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. या घटनेचे देशभरातून अनेकांनी कौतुक केलं आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनीही हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन करत पीडित मुलीच्या आत्म्याला शांती मिळाली असेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
याबाबत बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हैदराबादमध्ये जे घडलं त्यामुळे देशातील इतर पोलिसांना हिंमत मिळाली असेल. सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. ही फाईल बंद करा, कायद्यात चौकटीत ही घटना आणणं योग्य नाही असं सांगितले.
तसेच पोलिसांच्या या कारवाईने मुलींना आणि महिलांना बळ मिळालं आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. सरकारने आणि कोर्टाने त्यांच्या पाठिशी राहिलं पाहिजे. उन्नावबाबतीत जे घडलं तसं यापुढे व्हायला नको. आरोपींनी जेलमधून सुटून बलात्कार पीडितेला जाळलं हे कृत्य निषेधाचं आहे असंही मत प्रणिती शिंदे यांनी मांडले आहे.
#WATCH Hyderabad: Neigbours of the woman veterinarian, celebrate and offer sweets to Police personnel after the four accused were killed in an encounter earlier today pic.twitter.com/MPuEtAJ1Jn
— ANI (@ANI) December 6, 2019
मात्र पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटरची चौकशी व्हावी अशी मागणी वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मागणी केली आहे. देशभरातून सर्वसामान्यांकडून पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केले जात आहे. हैदराबाद पोलिसांवर फुलांचा वर्षाव करुन त्यांचे स्वागत सर्वसामान्य लोकांनी केले आहे.
#WATCH Hyderabad: People celebrate and cheer for police at the encounter site where the four accused were killed in an encounter earlier today. #Telanganapic.twitter.com/WZjPi0Y3nw
— ANI (@ANI) December 6, 2019
दरम्यान, एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशामार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनांवर पडदा पडावा यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरोच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, पण या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.