वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:50 PM2019-07-01T21:50:32+5:302019-07-01T21:51:48+5:30

वारी अन् वारकऱ्यांची महती जगभर प्रसिद्ध आहे. तर याच वारीत सर्वधर्मसमभावही पाहायला मिळतो.

Hyderabad's 'Abdul Rajjak', who has been the winner of the varkari in pandharpur last 15 years | वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

वारकऱ्यांची मसाज करणारे 'हैदराबादचे अब्दुलचाचा', 15 वर्षांपासून अखंड सेवा

मुंबई - पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी म्हणजे श्री विठ्ठल-रुक्मिणीचा आषाढी यात्रासोहळा 12 जुलैला होणार आहे. या श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखींची पाऊले पंढरीकडे येत आहेत. या पालख्यांसह शेकडो दिंड्या घेऊन लाखो वारकरी विठु-माऊलीच्या भेटीची आस घेऊन पंढरपुरला रवाना झाले आहेत. या वारकऱ्यांच्या दिंड्यामध्ये मीडियाच्या प्रतिनिधींपासून ते स्वयंसेवी संस्थांपर्यंत, राजकारण्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष असते. तर अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, संघटना, स्थानिक ग्रुपच्या माध्यमांतून वारकऱ्यांची सेवा केली जाते. 

पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या सजावटीला सुरुवात करण्यात येते. त्यानुसार पुण्यात लाईट डेकोरेशनचा व्यवसाय करणारे नेरे (ता. मुळशी, जि. पुणे) येथील विनोद जाधव यांनी मंदिराची मोफत विद्युत रोषणाई केली आहे. तर कित्येक, सेवाभावी संस्थाही वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावतात. मात्र, याच वारकऱ्याच्या सेवेसाठी वारीत दाखल झालेल्या अब्दुल रज्जाक यांची कथाच वेगळी आहे. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अब्दुल रज्जाक हे चक्क हैदराबादहून पुण्याला येतात. विशेष म्हणजे गेली 15 वर्षे ते वारीत दाखल होऊन वारकऱ्यांची सेवा करत आहेत. चालून चालून पाऊले दमलेल्यांचे पाय दाबणे, हात दाबणे, हाता-पायची मसाज करण्याचं मोठं काम अब्दुल रज्जाक करतात. त्यासाठी वारकऱ्यांकडून एकही रुपया घेतला जात नाही. याउलट आपल्याकडीलच औषधी वनस्पती आणि आयुर्वैदिक तेलाचा वापर ते करतात. 


 
वारी अन् वारकऱ्यांची महती जगभर प्रसिद्ध आहे. तर याच वारीत सर्वधर्मसमभावही पाहायला मिळतो. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी शेकडो मुस्लीम हातही पुढे येतात, त्यामुळे या वारीची सहिष्णू असं वर्णन केलं जात. अब्दुल रज्जाक हे गेल्या 15 वर्षांपासून हैदराबादवरुन पुण्याला वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येतात, ते प्रामुख्याने फिजोथेरपीचं काम करतात. वारीतील वारकऱ्यामध्ये पॅरालिसिस, सांधेदुखी असलेल्यांची ते मालिश करतात. तसेच, चालून चालून वेदनादायी बनलेल्या व्यक्तींचीही ते मजास करतात. पुण्यात ज्ञानोबा तुकारामांची पालखी दोन दिवस मुक्कामी असते. तेव्हा नानापेठ परिसरातील निवडुंग्या विठोबा मंदिराशेजारी गेल्या 15 वर्षांपासून अब्दुल रज्जाक आपलं दोन दिवसांच घर करतात. येथे पालखीतील वारकऱ्यांची मालिश करून देतात. काही ज्ञात असलेल्या आयुर्वैदीक वनस्पतींपासून ते स्वत: मालिशसाठी लागणारे तेल आणि औषध बनवतात. तसेच इलेक्ट्रीक फिजिओथेरपीचेही काम ते करतात, त्यामुळे वारकऱ्यांच्या हाताला तरतरी येते, हात व्यवस्थित काम करतात आणि पुढे चालण्यास उत्साह येतो. तर, गरज असलेल्या वारकऱ्यांच्या संपूर्ण शरीराचीही मसाज अब्दुलमियांकडून केली जाते. केवळ वारकऱ्यांची सेवा म्हणून अब्दुल रज्जाक वारीतील माऊलींची मालिश करतात. 

हिंदू-मुस्लीम भेद करणारे कुज्या मनाचे

हिंदू-मुस्लीम तणावाबाबत बोलताना अब्दुल यांचे विचार नक्कीच प्रेरणादायी आहेत. तो विषय म्हणजे प्रत्येकाचे आपले वैयक्तिक मत आहे, आपण त्याचा विचार करायचा नाही. सर्वजण एकच आहेत, सर्वांचं रक्त एकच आहे. देवाने आपल्यात काहीही फरक केला नाही, काही लोक त्यांच्या स्वार्थासाठी मुद्दामहून हा फरक करतात. सर्वांनी मिळून मिसळून राहावं, एकदिलाने राहावं त्यातच खरा आनंद आहे. जे असा दुजाभाव करतात, ती कुज्या मनाची माणसं असतात. आपण जेवढं मोठं मन करू, तेवढं आपला फायदा आहे, असे म्हणत एखाद्या मोठ्या तत्वज्ञानी माणसापेक्षाही सहज अन् सरळ तत्वज्ञान अब्दुल रज्जाक यांनी पटवून दिलंय. 
 

Web Title: Hyderabad's 'Abdul Rajjak', who has been the winner of the varkari in pandharpur last 15 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.