ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 05:50 AM2022-12-09T05:50:47+5:302022-12-09T05:51:37+5:30

दावोस परिषदेत होणार सामंजस्य करार

Hydrogen vehicle project to be built by Triton Company; Maharashtra will be the first state | ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

ट्रिटॉन कंपनी उभारणार हायड्रोजन वाहनांचा प्रकल्प; महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार

googlenewsNext

मुंबई - हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून, हा प्रकल्प सुरू करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून, जानेवारी २०२३ मध्ये दावोसमध्ये होणाऱ्या परिषदेत यासंबंधीचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा प्रकल्प सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. 

अमेरिकेच्या ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू पटेल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. या कंपनीला महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी पुणे, ऑरिक (औरंगाबाद), नागपूर असे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा हायड्रोजन वाहने ही वापरण्यास किफायतशीर, सुरक्षित असून, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांपेक्षादेखील स्वस्त आहेत. इंग्लंड, जर्मनी, चीन, अमेरिका, आदी देशांमध्ये हायड्रोजन वाहनांचा वापर होतो. महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन उपक्रमांतील बसेस भाडेतत्त्वावर घेऊन हायड्रोजनवर चालविता येणे शक्य आहे, त्यासाठी कंपनीने सविस्तर प्रस्ताव दिल्यास सकारात्मक निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.  

रोजगाराच्या संधी
प्रकल्प सुरू झाल्यानंतर इतर उद्योगदेखील महाराष्ट्रात सुरू होतील, परिणामी गुंतवणूक वाढेल आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

Web Title: Hydrogen vehicle project to be built by Triton Company; Maharashtra will be the first state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.