हायपरलूप ‘पायाभूत सुविधा प्रकल्प’ घोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:12 AM2018-11-05T06:12:31+5:302018-11-05T06:12:57+5:30
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
Next
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हायपरलूप प्रकल्पास स्वीस चॅलेंज पद्धती तत्वावरील ‘सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प’ म्हणून राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
पीएमआरडीएने १० सप्टेंबरला राज्य शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला होता, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.
डीपी वर्ल्ड एफझेडई आणि हायपूर लूप टेक्नॉलॉजीज, आयएनसी यांना मूळ प्रकल्प सूचक म्हणून मान्यता दिली आहे. तरतुदीनुसार प्रस्तुत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पीएमआरडीएने व्यवहार सल्लागाराची नियुक्ती तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांना पदनिर्देशित अधिकारी नियुक्त करण्यास मान्यता दिली आहे.