Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 11:25 AM2024-11-08T11:25:53+5:302024-11-08T11:29:08+5:30

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: मला क्लीनचीट मिळाली तेव्हा मी ठाकरे-पवारांना पेढेही दिले होते, असेही भुजबळ म्हणाले

I already got a clean cheat as no fear of going to jail again clarifies Chhagan Bhujbal denies the allegations | Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार

Chhagan Bhujbal Explanation on ED BJP Mahayuti: ईडीच्या कारवाईपासून सुटका मिळण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाला आणि ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता असे छगन भुजबळ म्हणाले, असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे. या आरोपांवर आज भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले.

"मी अशी कुठलीही मुलाखत दिलेली नाही. ईडीपासून सुटकेसाठी आम्ही भाजपासोबत गेलो किंवा महायुतीत आलो असा आरोप आमच्यावर आधीपासून होतोय. कोर्टाने मला उद्धव ठाकरे यांचे सरकार होतं तेव्हाच 'महाराष्ट्र सदन' प्रकरणात क्लीन चीट दिलेय. कोर्टाचा निकाल आल्यावर मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले आहेत. त्यामुळे मला तुरुंगात जाण्याची भीती आहे या सगळ्या गोष्टींचा मी इन्कार करतो", अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी ईडी आणि महायुतीसंदर्भात वक्तव्य केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, राजदीप सरदेसाई यांचे '२०२४: द इलेक्शन देंट सरप्राइज्ड इंडिया' हे पुस्तक काही दिवसांनी वाचेन, माझ्या वकिलांनाही देईन आणि त्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करेन, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

"५४ जणांच्या सह्यांचे पत्र आमच्याकडे होते. त्या ५४ जणांवर ईडीच्या केसेस नव्हत्या. याबाबत आम्ही आधीही सांगितलं आहे. आम्ही राज्यातील विविध भागांचा विकास व्हावा यासाठी निर्णय घेतला होता. आम्ही जो निर्णय घेतला त्याचा आम्हाला जनतेच्या विकासकामांसाठी नक्कीच फायदा झाला. या साऱ्या प्रकरणात ओबीसी किंवा एखाद्या विशिष्ट जातीचा इथे कुठलाही संबंध नाही," असेही छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. 

भुजबळ काय म्हणाले?

पुस्तकात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, छगन भुजबळ यांनी मुलाखतीत सांगितले, "मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते. दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता. आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता. मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही."

"मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांश नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांचीच सुटका झाली," असे भुजबळ म्हणाले असल्याचा पुस्तकात उल्लेख करण्यात आला आहे.

Web Title: I already got a clean cheat as no fear of going to jail again clarifies Chhagan Bhujbal denies the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.