PM Modi: 'मी उत्सुक आहे', महाराष्ट्र दौऱ्याआधी मोदींचे मराठीतून खास ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 06:19 PM2024-08-24T18:19:32+5:302024-08-24T18:20:21+5:30

PM Modi In Maharashtra: जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यापूर्वी मोदींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

I am excited, PM Modis special tweet in Marathi before Maharashtra Jalgaon visit | PM Modi: 'मी उत्सुक आहे', महाराष्ट्र दौऱ्याआधी मोदींचे मराठीतून खास ट्विट

PM Modi: 'मी उत्सुक आहे', महाराष्ट्र दौऱ्याआधी मोदींचे मराठीतून खास ट्विट

PM Modi In Jalgaon: लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (२५ ऑगस्ट) दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, पंतप्रधान मोदींच्या हस्ते महिलांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. जळगाव दौऱ्यावर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी खास मराठीतून ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

सरकारने महिलांसाठी लखपती दीदी योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत पात्र महिलांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहेत. जळगावमधील प्राईम इंडस्ट्रीयल पार्क या ठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, पंतप्रधान मोदींच्या उपस्थिती हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट

पीएम मोदींनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "लखपती दीदी संमेलनात सहभागी होण्यासाठी उद्या, 25 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात जळगाव येथे जाण्यास मी उत्सुक आहे. या कार्यक्रमात 11 लाख लखपती दीदींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतील. ही योजना महिला सक्षमीकरणाला  चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बचत गटांसोबत काम करणाऱ्या लक्षावधी महिलांना लाभ देण्यासाठी 2500 कोटी रुपयांचा  निधी जारी केला जाणार आहे." 

11 लाख लखपती दीदींना लाभ

केंद्र सरकारच्या लखपती दीदी योजनेंतर्गत ११ लाख नवीन लखपती दीदींना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. पंतप्रधान मोदी लखपती दीदी योजनेच्या लाभार्थी महिलाशी संवादही करणार आहेत. 

पंतप्रधान मोदींचा दुसरा दौरा

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. मुंबईतील विविध विकास कामे आणि योजनांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते करण्यात आला होता.

विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने आता सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. महायुती सरकारकडून योजनांच्या प्रचारावर भर दिला जात असून, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी जळगावमधील कार्यक्रमात काय बोलणार, हेही महत्त्वाचे असणार आहे. 

Web Title: I am excited, PM Modis special tweet in Marathi before Maharashtra Jalgaon visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.