इंद्राणीच्या घटस्फोटाशी माझा संबंध नाही!

By admin | Published: February 18, 2016 06:57 AM2016-02-18T06:57:50+5:302016-02-18T06:57:50+5:30

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची पीटर मुखर्जीशी ओळख मी २00१ सालच्या दरम्यान करून दिली होती, पण तिचा संजीव खन्नाशी झालेल्या घटस्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता

I am not concerned about Indrani's divorce! | इंद्राणीच्या घटस्फोटाशी माझा संबंध नाही!

इंद्राणीच्या घटस्फोटाशी माझा संबंध नाही!

Next

मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची पीटर मुखर्जीशी ओळख मी २00१ सालच्या दरम्यान करून दिली होती, पण तिचा संजीव खन्नाशी झालेल्या घटस्फोटाशी माझा काहीही संबंध नव्हता आणि पीटर आणि इंद्राणी यांच्या विवाहाचे निमंत्रण आपणास नव्हते, असे प्रख्यात नाटककार आणि जाहिरात क्षेत्रातील नामवंत म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅलेक पद्मसी यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
मी आणि इंद्राणी २00१ सालच्या दरम्यान प्रेसिडेंट हॉटेलमधील लायब्ररी बारमध्ये गेलो होतो. तिथे आम्हा दोघांना बसायला जागा नव्हती. त्यावेळी तिथे पीटर मुखर्जी बसलेले होते. त्यांनी आम्हाला त्यांच्या शेजारची जागा आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यावेळी मी त्या दोघांशी ओळख करून दिली, असे पदमसी यांनी नमूद केले आहे. इंद्राणी आयएनएक्स सर्विसेस नावाची रिक्रुटमेंट एजन्सी चालवत असल्याचे मला तेव्हा सांगण्यात आले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी मुंबईत आम्ही दोघांनी प्रेसिडेंटच्या लायब्ररी बारमध्ये भेटण्याचे ठरवले. तिथे पीटरच्या शेजारी आम्ही काही काळ बसलो होतो. नंतर मला ओबेराय हॉटेलात जायचे होते. इंद्राणीनेही माझ्यासोबत यावे, असे मी तिला सुचवले. मात्र ती पीटर मुखर्जीसोबतच बसून
राहिली, असे पदमसी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)सीबीआयला २६ नोव्हेंबर रोजी दिलेल्या दुसऱ्या जबानीत वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांनी म्हटले आहे की, मी अतिरिक्त पोलीस आयुक्त झाल्यानंतर २0१२ साली मुखर्जी दाम्पत्याने आपणाशी संपर्क साधला होता. त्यांच्या एका नातेवाईकाचा मोबाइलच्या आधारे माग काढण्याची विनंती त्यांनी केली होती.
दांपत्याची आणि माझी ओळख असल्याने त्यांच्या कामाची जबाबदारी मी पोलीस निरीक्षक अलकनुरे यांच्याकडे सोपवली. मात्र ते काम दोन दिवसांत झाले नाही. त्यानंतर मुखर्जी दांपत्याने माझ्याशी पुन्हा संपर्क साधला आणि सांगितले की त्या नातेवाईकाचा तपास करण्याची आता आवश्यकता नाही. त्या नातेवाईकाचा आणि आमचा संपर्क झालाआहे. त्यामुळे अलकनुरे यांनाही मी शोध थांबवण्यास सांगितले.

Web Title: I am not concerned about Indrani's divorce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.