"मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, जर..."; सुनील राऊतांची मागणी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:02 IST2024-12-07T14:00:59+5:302024-12-07T14:02:03+5:30
खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबद्दल एक पोस्ट केली आहे. संजय राऊतांनीही त्यांची पोस्ट रिट्विट केली आहे.

"मी आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार, जर..."; सुनील राऊतांची मागणी काय?
Sunil Raut Maharashtra News: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ईव्हीएमबद्दल विरोधकांकडून संशय व्यक्त केले जात असून, आता शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी राजीनामा देण्याच्या घोषणा करत एक मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाले, तर महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला. महाविकास आघाडीतील तीन पैकी एकही पक्षाला २० पेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या नाही. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे.
सुनील राऊतांचे म्हणणे काय?
आमदार सुनील राऊत यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. "महाराष्ट्रातील निकाल हे अविश्वसनीय आहेत. मी स्वतः माझ्या मतदारसंघात किमान ४० ते ५० हजारांच्या मताधिक्याने जिंकायला हवाच होतो. पण मी १६ हजारांच्या मताधिक्याने जिंकलो", असे राऊतांनी म्हटले आहे.
"हा निकाल विक्रोळीतील हजारो मतदारांना सुद्धा मान्य नाही. मी विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, जर का निवडणुका बॅलेट पेपरवर होणार असतील. होऊन जाऊद्या दूध का दूध, पानी का पानी!", अशी मागणी सुनील राऊत यांनी केली आहे.
— SunilRaut (@SunilRaut65) December 7, 2024
खासदार संजय राऊतांनी सुनील राऊतांची पोस्ट शेअर केली आहे. "मारकडवाडी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा", अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे राऊतांनी याकडे लक्ष वेधले आहे.