जातीच्या गुणांवर माझा विश्वास
By admin | Published: February 1, 2016 02:55 AM2016-02-01T02:55:30+5:302016-02-01T02:55:30+5:30
जातीच्या भिंतींवर नाही, पण गुणांवर माझा विश्वास आहे, असे मत बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. माळी समाज सावता परिषदेत आयोजित माळी समाज
पुणे : जातीच्या भिंतींवर नाही, पण गुणांवर माझा विश्वास आहे, असे मत बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मांडले. माळी समाज सावता परिषदेत आयोजित माळी समाज निर्धार मेळावा आणि तिसऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, मुंबईच्या आमदार मनीषा चौधरी व औरंगाबाद येथील आमदार अतुल सावे व सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, सावता परिषदेच्या महिला आघाडी अध्यक्षा कोमल म्हसवडे, ह.भ.प. रमेश वसेकर व नीता होले उपस्थित होते.
महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले यांना भारतरत्न मिळायला हवे, असे सांगून त्या म्हणाल्या, समाजाची योग्य घडी बसवायची असेल तर स्त्री-पुरुष भेद करून चालणार नाही. शेतकऱ्यांवर आता आलेली वेळ बदलण्याची वेळ आली असून ती जबाबदारी आमची आहे, असे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
परिषदेत करण्यात आलेल्या मागण्या
१. ज्योतिबा व सावित्रिबाई फुले यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे
२. ओबीसीचे स्वतंत्र मंत्रालय व्हायला हवे
३. ओबीसीची जातिनिहाय आकडेवारी जाहीर करावी
४. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ सुरु करावी. क्रिमिलियरची अट रद्द करावी
५. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे
६. ओबीसी महामंडळाला दरवर्षी १००० कोटीची तरतूद असावी
७. लिंगायत माळी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र
मिळावे.