मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो अन् सरकारलाही; संजय गायकवाडांचा आपल्याच सरकारला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 06:51 PM2023-12-01T18:51:59+5:302023-12-01T18:52:24+5:30
संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली. - संजय गायकवाड
धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिंदे सरकारविरोधातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मी सरकार म्हणून सरकारची कधीच पर्वा करत नाही. मी सरकारच्या मंत्र्यांना ही ठोकून काढतो, सरकारला ही ठोकून काढू शकतो, असे वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे.
याचबरोबर संविधानात बदल करणाऱ्यांनाही त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरला आहे. ज्या संविधानात 36 क्रमांकावर आरक्षण दिलेले आहे. कोण्या ह***** केले आहे, तेवढे आम्हाला बदलून द्या. बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने का होईना तुमची बाजू सक्षम पणे मांडेल. आपल्यातलाच कार्यकर्ता म्हणून मांडेन, असे गायकवाड म्हणाले.
संजय गायकवाड बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. धनगर समाजाला वेगळे आरक्षण द्यावे किंवा त्यांना इतरांचे हिसकावून घ्यावे, अशी कोणतीच मागणी धनगर समाजाची नाही. संविधानामध्ये घटनात्मक बदल करून जी जात या भारतात नाहीच, ती जात त्यात लिहली गेली. त्यामध्ये जर वेगळा बदल केला तर या समाजाला वेगळे आरक्षण देण्याची गरज नाही, असे गायकवाड म्हणाले.