देशात मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ?, मधुर भांडारकर यांचा काँग्रेसला सवाल
By admin | Published: July 16, 2017 12:27 PM2017-07-16T12:27:48+5:302017-07-16T12:28:21+5:30
मधुर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसनं तीव्र विरोध सुरूच ठेवला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - मधुर भांडारकर दिग्दर्शित "इंदू सरकार" चित्रपटाला काँग्रेसनं तीव्र विरोध सुरूच ठेवला आहे. पुण्यापाठोपाठ आता नागपुरातही मधुर भांडारकर विरोधात काँग्रेसनं निदर्शनं केली आहेत. नागपुरात मधुर भांडारकर हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये थांबले होते. काँग्रेस कार्यकर्त्यांना हे समजताच कार्यकर्ते हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये धडकले. त्याच वेळी मधुर भांडारकर पोलीस सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर रवाना झाले. भांडारकरच्या मागोमाग काँग्रेस कार्यकर्तेही विमानतळाकडे रवाना झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांचा मधुर भांडारकर यांच्या अंगावर शाही फेकण्याचा इरादा असल्याचंही समोर आलं आहे. पुण्यात एका हॉटेलमध्ये चित्रपटाची पत्रकार परिषद सुरु असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा घातला होता. आता नागपुरातही भांडारकरची पत्रकार परिषद काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसून आंदोलन केलं. गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागली असल्याची माहिती मधूर भांडारकर यांनी दिली आहे. भांडारकर यांनी या प्रकाराचा राहुल गांधींना टॅग करत ट्विटरच्या माध्यमातून निषेध नोंदवला आहे. देशात मला व्यक्ती स्वातंत्र्य नाही का ?, काँग्रेसचं गुंडगिरीला समर्थन आहे का ?, असा सवाल मधुर भांडारकर यांनी राहुल गांधींना विचारला आहे.
मधुर भंडारकर यांनी "इंदू सरकार" या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात पत्रकार परिषदेच आयोजन केलं होतं. पत्रकार परिषदे एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार एंड किचन या हॉटेलमधे ठरली होती. मात्र काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करु शकतात हे लक्षात आल्यानंतर ती पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. त्यानंतर मधूर भांडारकर बावधनमधील सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पुर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र त्या ठिकाणीही काँग्रेस कार्यकर्ते विरोध करण्यासाठी तयार असल्याने मधूर भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला आणि ते पुणे स्टेशनजवळील क्राऊन प्लाझा या ठिकाणी पोहोचले. या हॉटेलमधे पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली.

आणखी वाचा
या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १९७५ च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात २१ महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. 28 जुलै रोजी हा चित्रपट रिलीज होईल
Dear @OfficeOfRG after Pune I have 2 cancel today"s PressCon at Nagpur.Do you approve this hooliganism? Can I have my Freedom of Expression? pic.twitter.com/y44DXiOOgp
— Madhur Bhandarkar (@imbhandarkar) July 16, 2017