'पक्षासमोर मी बायकोचेही ऐकत नाही, उद्या जर...', चंद्रकांत पाटील यांचं विधान!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 05:49 AM2022-06-12T05:49:59+5:302022-06-12T05:50:26+5:30
कोल्हापूरचेच असलेले संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत; पण माझ्यासाठी पक्षहित महत्त्वाचे आहे
मुंबई -
पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. उद्या तिने अमुक माझा भाऊ आहे, असे सांगितले अन् ते पक्षहिताच्या आड येणार असेल, तर मी त्याला मदत करणार नाही, असे सांगतानाच फटके खाल्ल्याशिवाय शिवसेनेला शहाणपण येणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, कोल्हापूरचेच असलेले संजय पवार यांचा पराभव झाल्याचे मला दु:ख आहे. ते आमच्या जवळचे आहेत; पण माझ्यासाठी पक्षहित महत्त्वाचे आहे आणि पक्षनिष्ठेसमोर मी बायकोचेही ऐकत नसतो. विशेष म्हणजे, धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचा आग्रह पाटील यांनी धरला होता.
शरद पवार यांनीही फडणवीस यांना या विजयाचे श्रेय दिले हे चांगले झाले. फडणवीस हे तेल लावलेले पैलवान आहेत. कुणाच्या हातात सापडत नाहीत. त्यांनी शिवसेनेचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला. आता आम्ही विधान परिषदेच्या सहा जागा जिंकू, असेही ते म्हणाले.