मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो; एकनाथ शिंदेंचे भाऊक करणारे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 05:27 PM2024-02-17T17:27:29+5:302024-02-17T17:29:32+5:30
शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन सुरु आहे. यामध्ये शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले याचेही उत्तर दिले.
श्रीकांत तुमच्यासमोर काही या गोष्टी बोलणार नाही. परंतु मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो. मी जेव्हा घरी जायचो तेव्हा सगळे झोपलेले असायचे. त्याची माझी भेट महिना महिना होत नव्हती. तुम्हाला तो आपले कुटुंब समजतो. काल तो बोलला माझ्या बापाचा मला अभिमान आहे. पण मला त्याचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदेंच्या कालच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे कोल्हापुरात महाअधिवेशन सुरु आहे. यामध्ये शिंदे बोलत होते. यावेळी शिंदे यांनी शिवसेनेत बंड का केले याचेही उत्तर दिले. अधिवेशनासाठी जमलेल्या गर्दीमुळे शिवसेना कोणाची आहे? हे सांगण्याची आवश्यकता नाही, असे शिंदे म्हणाले.
आज हजारो लोक रस्त्याच्या दुतर्फा थांबतात, ते का थांबतात? याचं आत्मपरीक्षण विरोधकांनी करणे गरजेचे आहे. शिवसेनेची काँग्रेस आणि शिवसेनेच खच्चीकरण होत असल्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केले होते. म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना छातीवर दगड ठेवावा लागला. आम्ही कट्टर बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक होतो. मात्र, मला शिवसेना वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही हे पाऊल टाकले होते, असे शिंदे म्हणाले.
पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह 2004 पासून होता. एकनाथ शिंदे पदाला हपापलेला नाही. मला प्रेम हवे आहे. मला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरक्षा देखील दिली नाही. मग मला नक्षलवाद्यांकडून मारण्याचा तुमचा डाव होता का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.