"मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 11:48 AM2023-09-04T11:48:57+5:302023-09-04T11:49:26+5:30

Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली.

"I had already said that there will be no Maratha reservation, but...", Raj Thackeray spoke clearly in front of the protesters. | "मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले

"मराठा आरक्षण मिळणार नाही, हे मी आधीच सांगितलं होतं, पण...’’, आंदोलकांसमोर राज ठाकरे स्पष्टच बोलले

googlenewsNext

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार केल्याने राज्यातील राजकारण तापलेलं आहे. दरम्यान, येथील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. मराठा आरक्षण मिळणार नाही, असं मी जेव्हा आरक्षणासाठी मोर्चे निघत होते. हा न्यायालयातील तिढा आहे. काही गोष्टी तुम्ही कायद्याच्या दृष्टीने समजून घ्या, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं. 

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळेला तुमच्यापर्यंत त्या चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या. मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा सांगितलं होतं की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मी आताही इथे आंदोलनास बसलेल्यांना हेच सांगितलंय. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मतं पदरात पाडून घेतील आणि नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, असे त्यांनी सांगितले. 

राज ठाकरे पुढे म्हणले की,  हा सर्वोच्च न्यायालयातील तिढा आहे. तुम्ही काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने समजून घ्या. मात्र हे राजकारणी सतत तुम्हाला जातीचं आरक्षणाचं आमिष दाखवतात. कधी हे सत्तेत, तर कधी हे विरोधी पक्षात मग मोर्चे काढणार आणि सत्तेत आले की गोळ्या झाडणार. सत्तेत आल्यावर तुम्हाला तुडवणार. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा यांना तुमचं प्रेम आलेलं असतं आणि सत्तेत गेले की हेच लोक तुम्हाला मारायला उठतात, असा आरोपही त्यांनी केला. 

Web Title: "I had already said that there will be no Maratha reservation, but...", Raj Thackeray spoke clearly in front of the protesters.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.