"किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती, पण...", जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 10:54 IST2025-04-10T10:51:12+5:302025-04-10T10:54:11+5:30
Phule Movie controversy: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. या वादात उडी घेत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला खडेबोल सुनावले आहेत.

"किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती, पण...", जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावले
Phule Movie Jayant patil News: अभिनेता प्रतीक गांधी आणि अभिनेत्री पत्रलेखा राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला फुले चित्रपट वादात सापडला आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही आक्षेप घेण्यात आले. त्यातच सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्डावर संताप व्यक्त केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित फुले चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर वाद उभा राहिला. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सेन्सॉर बोर्डानेही या चित्रपटात काही बदल करायला सांगितले आहेत.
वाचा >>'फुले' सिनेमात 'ही' बालकलाकार साकारणार छोट्या सावित्रीबाईची भूमिका, कधी प्रदर्शित होतोय?
सेन्सॉर बोर्डाकडून सूचवण्यात आलेल्या बदलांच्या पत्राची प्रत शेअर करत जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाच्या मानसिकेतेवर बोट ठेवलं आहे.
'त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते'
जयंत पाटलांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या प्रोपगंडावर आधारित (propoganda based) फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र 'फुले'सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे."
"नामदेव ढसाळ कोण? (Who is Namdeo Dhasal?) असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोक बसतात याची कल्पना आली होती. पण आता 'फुले' चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते", अशा शब्दात जयंत पाटलांनी संताप व्यक्त केला.
काश्मीर फाईल्स, केरला फाईल्स सारख्या propoganda based फिल्म्सवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र "फुले" सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता… pic.twitter.com/T5UGUv2JSS
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) April 10, 2025
फुले चित्रपटातील काही संवाद, काही दृश्ये सेन्सॉर बोर्डाने बदलण्यास सांगितली आहेत. सेन्सॉर बोर्डाकडून पर्यायी शब्दही देण्यात आले आहेत. त्यामुळे हा मुद्दा आता तापल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी फुले चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण, त्याची तारीख बदलण्यात आली असून, आता २५ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.