आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही

By admin | Published: July 19, 2016 04:05 AM2016-07-19T04:05:55+5:302016-07-19T04:05:55+5:30

जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली.

I have no choice but to suicide | आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही

आत्महत्येशिवाय मला पर्याय नाही

Next


मुंबई: जोगेश्वरीतील मेघवाडी परिसरात शनिवारी सात घरांमध्ये घरफोडी करण्यात आली. ज्यातील एक घर पंढरपुरला दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याचे होते. घरफोडीमुळे मात्र मी पुर्णपणे उधवस्त झालो असुन आता ‘आत्महत्येशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही’ या भाषेत त्यांनी त्यांचे दु:ख बोलून दाखविले. त्यामुळे पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.
गणेश कदम असे या वारकऱ्याचे नाव असून ते मेघवाडी परिसरात राहतात. कदम यांना तीन वर्षे कमरेखालील अर्धांगवायूमुळे परळच्या केईएम रुग्णालयात उपचार घेत अंथरुणाला खिळून राहावे लागले. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यांना चालता येऊ लागले. त्यामुळे सर्व कुटुंबाने पंढरपुर याठिकाणी देवदर्शनाला जाण्याचे ठरविले. त्यासाठी गावातून त्यांच्या आई वडिलांना देखील बोलावले. त्यानुसार त्यांची आई याठिकाणी आली. मात्र गावातील त्यांचे जवळपास १५ ते १६ तोळे सोने त्यांनी सोबत मुंबईला आणले. तसेच कदम यांच्या पत्नीचेही १५ तोळे सोने असे जवळपास तीस तोळे सोने त्यांनी मेघवाडीतील घरातच ठेवले.
शुक्रवारी ते पंढरपूरला पोहोचले. शनिवारी त्यांचा फोन बंद होता. रविवारी त्यांना या चोरीबाबत समजले आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शुन्यापासुन उभे केलेले सर्व उद्धस्त झाले. त्याची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पोलिसांनीही कदम यांची तक्रार दाखल करवुन घेण्यास हयगय केली. ज्यामुळे अखेर त्यांना पोलीस ठाण्यावर मोर्चा न्यावा लागला.
पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी माझा गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय. पण माझ्या दोन मुलींकडे बघुन असे काही करता येत नाही. मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
>पोलिसांच्या कारवाईकडे स्थानिकांचे लक्ष
मेघवाडीतील घरफोडीप्रकरणी पोलीस आता या घरफोडीची उकल किती दिवसात करणार याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करविला असला तरी गेलेला ऐवज मला परत मिळण्याची आशाच नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय.मुलींचे शिक्षण अर्धवट टाकून आणि माझी नोकरी सोडुन मी घर विकुन गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे असे गणेश कदम यांनी सांगितले.

Web Title: I have no choice but to suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.