Shweta Mahale : "मला मदतीसाठी फोन आला होता, पण..."; फसवणुकीबाबत भाजपाच्या श्वेता महालेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 03:39 PM2022-07-19T15:39:36+5:302022-07-19T15:53:13+5:30

BJP Shweta Mahale :"माझ्या मतदार संघातला असल्याचं त्याने खोटे सांगितलं. त्यामुळे याबाबत माझी कसलीही आर्थिक फसवणूक झाली नाही."

I have not been cheated says BJP Shweta Mahale | Shweta Mahale : "मला मदतीसाठी फोन आला होता, पण..."; फसवणुकीबाबत भाजपाच्या श्वेता महालेंचं स्पष्टीकरण

Shweta Mahale : "मला मदतीसाठी फोन आला होता, पण..."; फसवणुकीबाबत भाजपाच्या श्वेता महालेंचं स्पष्टीकरण

googlenewsNext

मुंबई - आईला रुग्णालयात दाखल केले असून उपचारासाठी मदतीची गरज असल्याचे सांगून एकाने आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह ४ महिला आमदारांकडून पैसे उकळून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आमदार माधुरी मिसाळ यांची कन्या पूजा मिसाळ (रा. कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी मुकेश राठोड व गुगल पे फोन धारकावर गुन्हा दाखल केला आहे. यावर आता भाजपाच्या आमदार श्वेता महाले (BJP Shweta Mahale) य़ांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

"मलाही मदतीसाठी फोन आला होता मात्र आपण कसलीही मदत केली नाही. संबंधित तरुणाची संपूर्ण शहानिशा करून हा खोटं बोलत आहे याची माहिती घेतली होती. माझ्या मतदार संघातला असल्याचं त्याने खोटे सांगितलं. त्यामुळे याबाबत माझी कसलीही आर्थिक फसवणूक झाली नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे. दरम्यान गरजवंताला मदत होण्यासाठी अशा फसव्या लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे" असं श्वेता महाले य़ांनी म्हटलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मुकेश राठोड याने फोन केला. आपल्या आईला बाणेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचाराकामी दाखल केले असून तिचे मेडिकलकरीता पैशांची गरज असल्याचे सांगितले. त्यांना एक गुगल पेचा नंबर देऊन त्यावर ३ हजार ४०० रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी पैसे पाठविले. 

विधानसभेतील त्यांचे सहकारी आमदार मेघना बोर्डिकर साकोरे, आमदार देवयानी फरांदे आणि आमदार श्वेता महाले यांच्याकडूनही अशा प्रकारे काही रक्कम घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पूजा मिसाळ यांनी अगोदर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी प्राथमिक तपास केला असता आरोपींनी ४ महिला आमदारांशी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे तपास करीत आहेत.
 

Read in English

Web Title: I have not been cheated says BJP Shweta Mahale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा