फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 06:05 PM2021-08-25T18:05:19+5:302021-08-25T18:11:17+5:30

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे वाचनच करुन दाखवले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. तर, योगी आदित्यनाथ यांना ढोंगी म्हणत चपलेने मारावे, असे शब्द उद्धव यांनी वापरले होते.

I have not said anything wrong. But, if Devendra Fadvanis says it is wrong, then I will accept it says Narayan Rane | फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

फडणवीस म्हणाले होते, राणेंच्या वक्तव्याला समर्थन नाही, पण...; आता राणेंनीही स्पष्ट शब्दात दिलं उत्तर

Next


मुंबई - भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एका वक्तव्यावरून काल पोलिसांनी अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, नारायण राणे यांच्या वक्तव्याचे समर्थन नाही. मात्र, भाजप नारायण राणे यांच्या पाठिशी उभा राहील, असे म्हटले होते. यावर आता राणे यांनीही स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे म्हणणे मी स्वीकारेन, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (I have not said anything wrong. But, if Devendra Fadvanis says it is wrong, then I will accept it says Narayan Rane)

नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन झालेल्या संपूर्ण प्रकारावर आपली सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारला असता, "मी काही चुकीचे बोललेलो नाही. मात्र, जर देवेंद्र फडवणीस म्हणत असतील, की ते चुकीचे आहे, तर मी ते स्वीकारेन, कारण ते आमचे 'मार्गदर्शक' आहेत, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी न्यायालयाची ऑर्डरही वाचून दाखवली. याच बरोबर भाजपा खंबीरपणे आपल्या पाठिशी उभी राहिली, असेही राणे म्हणाले.

...तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; "असं वाटतंय, की त्याच चपलेनं योगी आदित्यनाथांना मारावं"

यावेळी, राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानांची उजळणीही केली. ''हे महाशय काय बोलले, सेना भवनबद्दल कुणी अशी भाषा करेल तर त्याचे थोबाड फोडा, हा गुन्हा नाही का? 120 (ब) होत नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचे वाचनच करुन दाखवले. त्यामध्ये, अमित शहांना निर्लज्जपणाने हा शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला होता. तर, योगी आदित्यनाथ यांना ढोंगी म्हणत चपलेने मारावे, असे शब्द उद्धव यांनी वापरले होते. पवारसाहेब ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा हा सुसंस्कृतपणा बघा," असे म्हणत राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला. 

'पवारसाहेब, ज्याला मुख्यमंत्री केलं त्याचा संसस्कृतपणा बघा, राणेंनी वाचनचं केलं'

Web Title: I have not said anything wrong. But, if Devendra Fadvanis says it is wrong, then I will accept it says Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.