मला आई-बाबांची तक्रार द्यायचीयं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2016 04:50 AM2016-12-23T04:50:37+5:302016-12-23T04:50:37+5:30
‘पोलीस काका, मला माझ्या आई-बाबांची तक्रार द्यायची आहे. ते दोघेही मला नेहमी धमकी देतात की, तू चांगला वागला नाहीस
औरंगाबाद : ‘पोलीस काका, मला माझ्या आई-बाबांची तक्रार द्यायची आहे. ते दोघेही मला नेहमी धमकी देतात की, तू चांगला वागला नाहीस, तर तुला पोलिसांकडे देऊन टाकू. आज मीच तुमच्याकडे आलो. माझे अन् वडिलांचे दोघांचे म्हणणे तुम्ही ऐका... कोणाचे बरोबर, कोणाचे चूक, हे तुम्ही ठरवा व ज्याची चूक असेल त्यास शिक्षा करा’, अशी निरागस तक्रार ८ वर्षाचा चंचल (नाव बदललेले) पोलीस निरीक्षकांकडे करीत होता. या चिमुकल्याचे बोलणे ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटले.
गारखेडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी चंचलने पोलीस निरीक्षकांना, आई-वडिलांविषयीची तक्रार शांतपणे सांगितली.(प्रतिनिधी)