"मी तुला आतून बाहेरून ओळखतो…"; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकारांच ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 08:05 PM2024-07-22T20:05:16+5:302024-07-22T20:10:12+5:30

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

"I know you inside and out..."; Ravikant Tupkar's tweet after being expelled from the party | "मी तुला आतून बाहेरून ओळखतो…"; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकारांच ट्विट!

"मी तुला आतून बाहेरून ओळखतो…"; पक्षातून हकालपट्टी झाल्यावर रविकांत तुपकारांच ट्विट!

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रविकांत तुपकर यांनी माजी खासदार राजू शेट्टीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती. याप्रकरणी निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या सदस्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

रविकांत तुपकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केल्यानंतर रविकांत तुपकर यांनी ट्विट केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. "संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो", असं रविकांत तुपकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची "विझलो जरी आज मी…" या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान, २२ वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जिवाचं रान केलं, त्याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून असा निर्णय धक्कादायक आहे. राजू शेट्टी आणि माझ्यामध्ये का दुरावा निर्माण झाला हे मला माहिती नाही. कांदा आणि धानासाठी आंदोलन केले ही आमची चूक आहे का? असा सवाल करत राजू शेट्टी असा निर्णय घेतील असं मला अपेक्षित नव्हतं. २४ तारखेला आम्ही बैठक बोलावली आहे, त्या बैठकीत पुढील निर्णय घेणार आहोत, असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

सोमवारी (दि. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, पदाधिकारी सतीश काकडे, घनशाम चौधरी, विठ्ठ्ल मोरे, अमरसिंह कदम, अनिल पवार उपस्थित होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या विरोधात आरोप करणारे रविकांत तुपकर यांनी २०१९ ची विधानसभा तोंडावर असताना संघटना सोडून गेले ते का गेले याचे उत्तर आम्हाला मिळाले नाही. पण एक महिन्याचा कालावधी गेल्यानंतर परत ते संघटनेमध्ये आले. तेव्हा संघटनेमध्ये प्रवेश घेताना तुम्हाला पद दिले जाणार नाही, एक सामान्य कार्यकर्त्यासारखे काही दिवस तुम्हाला काम करावे लागेल. या अटीवर संघटनेने त्यांना परत घेतले. त्यानंतर ते संघटनेच्या बैठकींना, ऊस परिषदांना उपस्थित राहिलेले नाही. वारंवार त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांनी मौन बाळगणे स्वीकारले.

याचबरोबर, संघटनेने चार वर्षे वाट पाहिली मात्र आता वाट पाहू शकत नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचा आजपासून रविकांत तुपकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते संबंध संघटनेने तुमच्यासोबत संपलेले आहेत. तसेच, मी चळवळीमध्ये आहे असं म्हणतात आणि संघटनेच्या नेतृत्वावर सातत्याने प्रसार मीडियातून आघात करत असताना बघायला मिळाले. तसेच अलीकडे ते स्वाभिमानी संघटना ही माझी संघटना आहे असा संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोपही सतीश काकडे यांनी केला आहे.
 

Web Title: "I know you inside and out..."; Ravikant Tupkar's tweet after being expelled from the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.