"मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:34 AM2023-10-17T09:34:51+5:302023-10-17T09:35:21+5:30

तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं त्यांनी सांगितले.

"I look forward to what's next in the political future, in a state of confusion." Says Pankaja Munde | "मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष"

"मी गोंधळलेल्या स्थितीत, राजकीय भविष्यात पुढे काय होईल याकडे लक्ष"

मुंबई – राष्ट्रीय पातळीवर मी खूप काही करतेय असं नाही, माझी राष्ट्रीय सचिव म्हणून भूमिका आहे. मध्य प्रदेशात मी सहप्रभारी आहे. मला जे सांगितले जाते ते मी करते. परंतु राजकीयदृष्ट्या समाधानी म्हणाल तर मी स्वत: प्रचंड गोंधळलेल्या स्थितीत, काय सुरू आहे मला कळत नाही. माझ्या वैयक्तिक राजकारणापुरते मी सांगते. पुढच्या भविष्यात काय होणार आहे. राजकारणात पुढचे निर्णय काय होणार आहेत याकडे सगळे लक्ष ठेवून आहेत तसं मीदेखील लक्ष ठेवून आहे असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे.

पंकजा मुडे म्हणाल्या की, माझी भूमिका आहे ती राज्यात नाही, तर राज्याच्या बाहेर आहे. एखादा व्यक्ती केंद्रात काम करतो, उदाहरण द्यायचे झाले तर एका वृक्षाचे टोक केंद्रात असले तरी त्याची मूळं राज्यात असतात. ती मूळे तो उखडून नेत नसतो. म्हणजे प्रमोद महाजन पूर्णवेळ राष्ट्रीय राजकारणात शिफ्ट झाले. तसे गोपीनाथ मुंडे करू शकले नाहीत. कारण त्यांचा मतदारसंघ आहे, ग्राऊंड पातळीवर समर्थक आहेत. त्यामुळे इथं मूळे आहेत. त्यामुळे या मूळांना मी काय देऊ शकते हेच माझं राजकारणातील ध्येय असणार आहे. भविष्यात माझे राजकारण काय असेल यावर माझ्यासह अनेकांना प्रश्न पडलाय. कारण आता नवीन मित्र आम्हाला जोडला गेलाय. तिकीट वाटपाचे कसे असेल. तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत असं त्यांनी सांगितले. एबीपीवरील मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

त्याचसोबत मी या परिस्थितीतून कसं बाहेर पडेन हे सांगू शकत नाही. परंतु मी बाहेर पडेन. मी जेवढे वर्ष राजकारणात आहे त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न आहे. स्वत:ची कोंडी कुणी करत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे. केवळ माझीच नाही तर अनेकांची आहे. कुणी समोर येऊन बोलत नाही. माझा अभूतपूर्व आणि अद्वितीय असा अनुभव आलाय. लोकांचा प्रतिसाद माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि सकारात्मक बळ देणारा आहे. मी वाट पाहतेय, आज राजकीय पटलावर माझ्याकडे जी शक्ती आहे ती लोकांची ताकद आहे असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

दरम्यान, १० वर्ष खासदार असलेल्या, रोज झटणाऱ्या प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून स्वत:चे प्रस्थ तिथे बसवणे हे मी करणार नाही. प्रीतम मुंडे जे काम करू शकतात ते त्याच करू शकतात. खासदार म्हणून त्यांनी पदाला न्याय दिला आहे. मतदारसंघातील लोकांशी संपर्क आहे. बाबा असल्यापासून मी राज्याकडे लक्ष देतंय. प्रीतम मुंडे हे त्या मतदारसंघात मर्यादित आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे काम आपण पुसावे याला अंहकार म्हणतात जो माझ्यात नाही असं सांगत पंकजा मुंडे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत.

  

Web Title: "I look forward to what's next in the political future, in a state of confusion." Says Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.