उबरची ‘मी पण मालक’ योजना
By admin | Published: July 29, 2016 12:49 AM2016-07-29T00:49:14+5:302016-07-29T00:49:14+5:30
खासगी टॅक्सी कंपन्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘उबर’ने काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांसाठी ‘मी पण मालक’ योजना सुरू करण्याचा
मुंबई : खासगी टॅक्सी कंपन्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘उबर’ने काळ्या-पिवळ्या टॅक्सीचालकांसाठी ‘मी पण मालक’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांना जादा उत्पन्न मिळवून देण्याचा दावाही उबर कंपनीकडून करण्यात आला आहे.
खासगी टॅक्सी कंपन्यांकडून प्रवाशांना आणि चालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मध्यंतरी खासगी टॅक्सी वाहतूकदारांनी दरकपातीचा मार्ग स्वीकारल्यानंतर उबर कंपनीने थेट ‘मी पण मालक’ नावाच्या योजनेची घोषणाच काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि रिक्षाचालकांसाठी केली आहे. त्यात कंपनीने चालकांना प्रमुख वित्तीय संस्थेप्रमाणेच कार उत्पादकांशी भागीदारीची संधी दिली असल्याचे काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
टॅक्सींप्रमाणेच रिक्षा-चालकांनाही कमी गुंतवणूक करत योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)