"मोदीजी... विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे, त्यांना लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 11:54 AM2022-02-20T11:54:23+5:302022-02-20T11:55:59+5:30
NCP Jayant Patil And Narendra Modi : रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केलं आहे.
मुंबई - "मोदीजी... विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे. त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा" अशी विनंती करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना टॅग करून केले आहे.
युक्रेनच्या लष्कराने युद्धा सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केलं आहे.
रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यांना मदत हवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
The situation on the #RussiaUkraine border has been escalating for the last 15 days. There are approx 18k Indians, most of them are students in #Ukraine, waiting for the help. I request PM @narendramodi to ensure the safety of students & evacuate them asap. They are our future.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 20, 2022