मला वेध लागले पावसाचे

By Admin | Published: June 9, 2014 11:11 PM2014-06-09T23:11:05+5:302014-06-09T23:11:05+5:30

उन्हाच्या लाहीलाहीने जीवाची झालेली काहिली संपून कधी पावसाच्या सरी पडतात, याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे.

I started looking around | मला वेध लागले पावसाचे

मला वेध लागले पावसाचे

googlenewsNext
>सायली कडू - मुंबई
उन्हाच्या लाहीलाहीने जीवाची झालेली काहिली संपून कधी पावसाच्या सरी पडतात, याकडे आता सर्वाचेच लक्ष लागले आहे. मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर मुंबईसह राज्यभरात लवकरच धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सर्वाधिक उत्साह आहे तो तरुणाईमध्ये.
या यंगस्टर्सचे आतापासूनच पावसाळी सहलींचे नियोजन सुरू झालेले दिसून येत आहे. पहिला पाऊस पडल्यावर कधी आणि कुठे जायचे याचे प्लॅनिंग आता कट्टय़ासह व्हाट्सअॅप आणि फेसबुकवर सुरू झाले आहे. पहिला पाऊस तसा तरुणाईचा जिवलग सखा. पहिल्या पावसात चिंब भिजताना तरुणाई पूर्णपणो हरखून जाते. बाइकवर बसून लॉँग ड्राइव्हला जायचे, जुहू चौपाटी किंवा बॅण्डस्टॅण्ड गाठायचे, मस्तपैकी मका खायचा याची चर्चा यंगस्टर्समध्ये सुरू आहे. तर कोणी कुटुंबीयांसह किंवा मित्रमैत्रिणींसह सहलीला जाण्याचे प्लॅन करत आहेत. सहल माथेरानला काढायची की लोणावळा, की महाबळेश्वरला जाऊयात या चर्चानाही आता वारे फुटले आहेत. तर काही जण सध्या काही प्लॅन झाला नसला तरीही गरमागरम भजीबरोबर कॉफी प्यायचीच, अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
 
दोन दिवस मनसोक्त भटकणार
‘हा उन्हाळा अत्यंत उकाडय़ाचा गेला असल्याने पावसाच्या सरी अंगावर घेण्यासाठी मी आसुसलो आहे. माङया ग्रुपबरोबर पावसाळ्यात लोणावळा येथे जाण्याचे प्लॅनिंग केले आहे. मुंबईपासून जवळचे ठिकाण असल्याने दोन दिवस सहल काढून पावसात भिजण्याची इच्छा आहे. त्याचबरोबर तेथील प्रसिद्ध गरमागरम मका भजी खाण्याचे मी ठरवले आहे.’ - रोनक टिबारेवाला
 
मस्त फुटबॉल खेळणार
‘मला पावसाळ्यात फुटबॉल खेळायला फारच आवडते. पावसाच्या जोरदार सरी अंगावर पडत असाताना फुटबॉल खेळणो. त्यानंतर घरी जाऊन कांदा भजी आणि गरमागरम कॉफीचा आस्वाद घेणो हा माझा सर्वात आवडता कार्यक्रम आहे. आता सर्वाबरोबरच मीही चातकाप्रमाणो पावसाची वाट पाहत आहे.’ - मित वसावडा
 
फोटोग्राफीची मजा औरच
‘उन्हाळ्यानंतर पडणा:या पावसाच्या सरींनी आल्हाददायक वातावरण होते. पहिल्या पावसाच्या सरींनी निसर्गालाही पालवी फुटते, अशा 
या वातावरणात फोटोग्राफी करण्याची मजा काही औरच असते. यातच ओल्या मातीचा तो सुगंध मनावरचा ताण कमी करणारा वाटतो. त्यामुळे पावसाळ्यात चिंब भिजून गरमागरम कांदा भजी खाण्याची मी वाट पाहत आहे.’
- नेहा पोकळे
 
बाइक चालवण्याची मजा अनुभवणार
‘पावसाचे टपोरे थेंब अंगावर पडत असतानाच बाइक चालवणो म्हणजे धम्माल. पावसाळा म्हणजे फूल्ल ऑफ फन डेज. मी फ्रेंड्सबरोबर पिकनिक प्लॅन करणार आहे. अजून आमची ठिकाणो काही ठरली नाहीत. तरीही लवकरात लवकर ठरवून पावसाळी सहल आयोजित करणार आहोत.’ - जय वसावडा
 
शेतक:यांना फायदा व्हावा
‘मला पावसाळा फार आवडतो याचे कारणही तसेच आहे. शेतक:यांना शेतीसाठीचा हा उत्तम काळ असतो. पावसावरच शेती अवलंबून असते आणि पिण्यासाठीही याच पाण्याचा वापर होत असतो. या वेळी पावसात भिजायला मित्र-मैत्रिणींबरोबर लॉँग ड्राइव्हला जाणार आहे. मला समुद्रकिना:यांवर पावसाचे थेंब अंगावर घेताना फार धम्माल येते. म्हणूनच जुहू बीच, मार्वे बीच आणि गिरगाव चौपाटी गाठण्याचा माझा विचार आहे.’ - पल्लवी ठाणोकर
 

Web Title: I started looking around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.