मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, मंत्री काय करता?; शिंदे गटाच्या आमदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 10:11 AM2022-10-19T10:11:20+5:302022-10-19T10:11:58+5:30

संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला. 

I think of myself as CM, what does a minister do?; Statement of MLA of Shinde group Kishor Patil | मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, मंत्री काय करता?; शिंदे गटाच्या आमदाराचं विधान

मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, मंत्री काय करता?; शिंदे गटाच्या आमदाराचं विधान

googlenewsNext

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. पहिल्या विस्तारात स्थान न मिळालेल्या नेत्यांनी दुसऱ्या विस्ताराकडे आस लावून बसले आहेत. मात्र मंत्रिमंडळ कधी होणार याबाबत अद्यापही ठोस सांगितले जात नाही. त्यातच मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार रखडल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचं बोललं जात आहे. आमदार किशोर पाटील नाराज असल्याच्या बातम्यासमोर आल्यानंतर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

आमदार किशोर पाटील म्हणाले की, मला अजून सूत्र कळाले नाही. हे सूत्र कुठून येते? मी कधीही नाराज नव्हतो. मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, हे मंत्री काय करता? निश्चित मी मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. परंतु माझी नाराजी नव्हती. आजही नाही आणि उद्याही राहणार नाही. संधी मिळाली तर नक्कीच त्याचं सोने करेन. मला जो विभाग मिळेल त्यामाध्यमातून राज्याच्या हिताचे निर्णय घेईन पण मी नाराज नाही एवढं नक्की असा खुलासा त्यांनी केला. 

तसेच अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भारतीय जनता पार्टीने उमेदवार मागे घेण्याचा जो निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे. एखाद्या घरातील आमदार दगावला असेल तर त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली असेल तर ही महाराष्ट्राची परंपरा आहे. भाजपाने माघार घेतल्याने अतिशय चांगला निर्णय घेतला असून मी त्यांचे मनापासून कौतुक करतो असंही आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं. 

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन ३ महिने उलटले तरी दुसरा विस्तार पार पडला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दिवाळीआधी विस्तार होईल असं मानलं जात होते. परंतु अद्याप त्याला मुहुर्त मिळाला नाही. मात्र पक्षातील अस्वस्थता दूर करण्यासाठी काही आमदारांना महामंडळावर संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या नाराजांना शांत करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलण्यास सुरुवात केली असल्याचं दिसून येते.
 

Web Title: I think of myself as CM, what does a minister do?; Statement of MLA of Shinde group Kishor Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.