मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 04:42 PM2019-07-23T16:42:35+5:302019-07-23T16:43:46+5:30

दरवेळी एखादा पुरुषच हिरो असतो असे नाही.हिरो या संज्ञेला जेंडरमध्ये बांधणे चुकीचे आहे...

I want to be a hero, not a heroine: Taapsee Paannu | मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

मला हिरोईन नव्हे हिरो व्हायचं आहे : तापसी पन्नू

Next
ठळक मुद्देलोकमत वूमन समिटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसीला लोकमत उमंग पुरस्कार

पुणे : दरवेळी एखादा पुरुषच हिरो असतो असे नाही.हिरो या संज्ञेला जेंडरमध्ये बांधणे चुकीचे आहे. हिरो म्हणजे आपला आदर्श असतो. त्यामुळे हिरो स्त्रीही असू शकते. आणि त्यामुळे मला हिरोईन नव्हे तर हिरो व्हायचं आहे असं मत अभिनेत्री तापसी पन्नू हिने व्यक्त केलं.

लोकमत वूमन समिटच्या आठव्या पर्वामध्ये अभिनेत्री तापसीला लोकमत उमंग पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी 'तेजस्विनी' या विषयावर आधारीत परिसंवादात ती लोकमत एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्यासह सहभागी झाली  होती.

तापसी म्हणाली, आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनामध्ये  खूप तफावत आहे. अभिनेत्याचे नाव पाहूनच पिक्चर चालतो, अभिनेत्रीचा चित्रपट मात्र आशय चांगला असेल तरच चालतो. बदल एका रात्रीत घडत नाही. मात्र, चित्रपटसृष्टीत बदल घडायला सुरुवात झाली आहे, हेही नसे थोडके.'

कबीर सिंग या चित्रपटाबाबत तापसीने परखड मत व्यक्त केले. ती म्हणाली, 'चित्रपट चालतो तेव्हा तो पाहणारे केवळ पुरुष असतात का? कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो.  नकारात्मक भूमिका दाखवणे वाईट नाही. मीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. मात्र, नकारात्मकतेचे उदात्तीकरण चुकीचे आहे. या मानसिकतेला मी माझ्या चित्रपटातून नक्की प्रत्युत्तर देईन. मी हार मानणार नाही.'

Web Title: I want to be a hero, not a heroine: Taapsee Paannu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.