'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 11:23 AM2019-12-05T11:23:13+5:302019-12-05T11:29:46+5:30

फेसबुक, व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर तरुणाई या वाक्यावर मीम्स, व्हिडीओ बनवत होती

'I will come again' to tourist forest department after enjoying a walk in the tiger project! | 'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक

'मी पुन्हा येईन'! व्याघ्र प्रकल्पात फिरण्याचा आनंद घेतल्यानंतर पर्यटकाचा वनविभागाला फिडबॅक

Next

मुंबई - सध्या सोशल मीडियावर मी पुन्हा येईन या वाक्याने धुमाकुळ घातला आहे तसा हा शब्दही लोकांसाठी विनोदाचं माध्यम बनलं आहे. अशातच आणखी एक किस्सा समोर आला आहे. यात गोंदियातील कोका अभयारण्यात पर्यटनसाठी गेलेल्या एका पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये मी पुन्हा येईन असा अभिप्राय दिला आहे. हा फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मी पुन्हा येईन अशा आशयाची कविता सादर केली होती. त्यानंतर अनेक भाषणात मी पुन्हा येईन असा प्रचार केला होता. देवेंद्र फडणवीस यांचे हे वाक्य यंदाच्या निवडणुकीत सगळ्यात गाजलेले आणि प्रसिद्ध झालेले वाक्य बनलं. तरुणाईपासून अनेकांनी या वाक्याचा आधार घेत अनेक विनोदाचे किस्से आणले. 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी आलेल्या दिपक साखरकर या पर्यटकाने फिडबॅक फॉर्म भरुन देताना त्यात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असं लिहिल्याने वनविभागात चांगलीच चर्चा रंगली. या वाक्यातून पर्यटकाला दिलेल्या सुविधा मनापासून आवडल्याचं दिसून येत असल्याचं वन कर्मचारी सांगतात.  

फेसबुक, व्हॉट्सअप आणि टिकटॉकवर तरुणाई या वाक्यावर मीम्स, व्हिडीओ बनवत होती. विरोधकांनीही देवेंद्र फडणवीस यांच्या वाक्यावरुन भाजपाला आणि फडणवीस यांना अनेक टोले लगावले. तसेच मी पुन्हा येईन हे वाक्य इतकं प्रचलित झालं की त्यावरही गाणंदेखील तयार करण्यात आलं. 

विधानसभेच्या विशेष अधिवेशनातही देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी उपरोधिक टोला लगावला होता. फडणवीस मी परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले तर मी कधीच म्हटलो नाही की मी इथं येईन, पण यावं लागलं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. गेल्या महिनाभरापासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या नाट्यामध्ये अशाप्रसंगी राजकीय विनोदाची झालर निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर पाहायला मिळाली. 
 

Web Title: 'I will come again' to tourist forest department after enjoying a walk in the tiger project!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.